एक्स्प्लोर

अजितदादांविरोधात शड्डू ठोकणार का? विधानसभा निवडणुकीबाबत युगेंद्र पवारांनी प्लॅन सांगितला

Yugendra Pawar, Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Yugendra Pawar, Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकसभा निवडणूकीत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना मैदानात उतरवले. अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतली. मात्र, पवार कुटुंबातील बहुसंख्य लोक शरद पवारांच्या पाठिशी उभे राहिले. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार थेट सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरले. त्यांनी अजित पवारांवर टीका करतानाही मागेपुढे बघितले नाही. दरम्यान, आता युगेंद्र पवार (Yugendra Pawar) बारामतीत जनता दरबार घेत राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे ते विधानसभा निवडणूक लढणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. यावर आता युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी देखील भाष्य केलं आहे. 

युगेंद्र पवार म्हणाले? 

पाण्याचे विषय आहेत, अॅडमिशनचा विषय आहे, त्यासाठी मी आज इथे आलोय. वादळामुळे घराचे छत गेली आहेत. अनेक विषय आहेत. मी याला जनता दरबार म्हणत नाही. आपल लोकांशी डायलॉग आणि सुसंवाद ठेवलाय. वादळामुळे नुकसान झालं त्या लोकांना घरी जाऊन मदत करतोय. ज्या पद्धतीने मदत करता येईल, ते करतोय. 

विधानसभेबाबत काय म्हणाले युगेंद्र पवार ?

दरवेळी मला विधानसभेबाबत प्रश्न विचारला जातोय. दरवेळेला मी एकच उत्तर दिलं आहे. मी विधानसभेबाबत विचार केलेला नाही. मला त्याबाबत विचार करु द्या. मी लोकांची कामे करतोय. मला लोकांची काम करु द्या. विधानसभेला अजून वेळ आहे. मीडियानेच माझ्याबाबत चर्चा सुरु केले आहे, असे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी स्पष्ट केले आहे. 

युगेंद्र पवारांकडे सध्या कोणत्या जबाबदाऱ्या?

युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आहेत. तर अजित पवारांचे पुतणे आहेत. बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद सध्या त्यांच्याकडे आहे. विद्या प्रतिष्ठाणचे खजिनदारपदही युगेंद्र पवार यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी त्यांच्या कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरुन टीका देखील केली होती.  युगेंद्र पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी जीवाचं रान केलं. सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळे या देखील युगेंद्र पवारांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करताना दिसल्या होत्या. 

Yugendra Pawar Baramati : युगेंद्र पवार मतदानानंतर अॅक्शन मोडवर;दर मंगळवारी बारामतीकरांसाठी हजर राहणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
Success Story: पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
Suresh Dhas : आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...
आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas Speech Parbhani | अजित पवारांना सवाल, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल, सुरेश धस यांचं परभणीत आक्रमक भाषणManoj Jarange Speech Beed | देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा इशाराParbani Andolan : परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा; बंजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागरही येण्याची शक्यताPrakash Solanke On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरुन हटवा, अजित पवार,फडणवीसांकडे मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
Success Story: पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
Suresh Dhas : आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...
आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
Sachin Tendulkar on Rishabh Pant : ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
Ram Shinde : विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या
Australia vs India, 5th Test : इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?
Embed widget