एक्स्प्लोर

अमित ठाकरे विधानसभा लढवणार?; मनसैनिकांनी दिले संकेत, वाढदिनी शक्तिप्रदर्शन, एकच जल्लोष

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसादिनी ज्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन करण्यात आलं, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मनसेच्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसून आला.

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील (Election) यंदाच्या हंगामात राजकीय नेत्यांची पुढची चांगलीच आक्रमकपणे प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना फुटीमुळे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हे जबाबदारी घेऊनच मैदानात उतरल्याचं दिसून आलं. शिवसेना व महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांसाठी रोड शो व प्रचारसभांमधून ठाकरे शैलीत सरकावर हल्लाबोल केला. दुसरीकडे शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार हेही आक्रमक झाल्याचे दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीही महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार केला. तर,  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हेही राजसभेत दिसून आले. लोकसभा निवडणुकीत मनसेने थेट सहभाग घेतला नव्हता. मात्र, गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेशच मनसैनिकांना दिले होते. आता, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दुसरे ठाकरे थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसादिनी ज्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन करण्यात आलं, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मनसेच्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसून आला. त्यावरुन, आता अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरुवात करत असल्याची चर्चा रंगली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क, वरळीसह अनेक भागात अमित ठाकरेंचे होर्डींग्ज लावल्याचे दिसून आले. तर, मनसैनिकांनीही त्यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. चेंबुरमध्ये मंत्रालय व लाल दिव्याच्या गाडीचा केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला.

अमित ठाकरे लोकसभा निवडणुकीत चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तत्पूर्वी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी, राज ठाकरेंसमवेत अमित ठाकरेही भेटीसाठी हजर होते. या भेटीनंतर त्यांनी ग्रेटभेट असं कॅप्शन लिहून फोटोही शेअर केले होते. तर, मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीची सांगता सभा झाली. या सभेदरम्यान अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, अमित ठाकरे आता संसदीय राजकारणात सक्रीय होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच, वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही काही सूचक संकेत देण्यात आले आहेत. 

मंत्रालय, लालबत्तीची गाडी असलेला केक

अमित ठाकरे यांच्या वाढदिनी मनसैनिकांनी मध्यरात्रीच मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. मनसेचे चेंबूर विभागाचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी अमित ठाकरेंसाठी आणलेला केक चर्चेचा विषय ठरला. विधान भवन, मंत्रालय आणि लाल बत्तीची गाडी असलेला हा केक अमित ठाकरेंनी लवकर मंत्रालयात जावे, या शुभेच्छा देणारा होता. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांनी देखील हा केक कापून मनसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. अमित ठाकरे हे तरुणांचा आवाज आहे, तो मंत्रालयात जावा या शुभेच्छा देत आम्ही मनसैनिक कामाला लागलो आहोत, म्हणून हा अनोखा केक त्यांच्यासाठी आणल्याचे मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी यावेळी म्हटले होते. 

मनसे विद्यार्थी सेनेतून सुरुवात

अमित ठाकरे यांनी मुंबईतील डीजी रुपारेल कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून त्यांनी राजकीय करिअरची सुरुवात केली. मुंबईसह पुण्यात विद्यार्थ्यांच्या विषयांना धरुन त्यांनी आंदोलने केली आहेत. तर, काही दिवसांपूर्वी नाशिकच्या टोल नाक्यावरही त्यांच्या नेतृत्त्वात मनसैनिकांनी तोडफोड केली होती.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Embed widget