एक्स्प्लोर

माध्यमांचे प्रतिनिधी का जमले आहेत? शरद पवारांची आव्हाडांकडे विचारणा, अजित पवार गटाच्या आमदार भेटीबाबत पवार अनभिज्ञ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील सर्व आमदार यशवंतराव चव्हाण सेंटर शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले खरे, मात्र आमदारांच्या भेटीबाबत शरद पवार अनभिज्ञ असल्याचं समोर आलं आहे.

Ajit Pawar Meets Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह त्यांच्या गटातील सर्व आमदार यशवंतराव चव्हाण सेंटर शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या भेटीसाठी पोहोचले खरे, मात्र आमदारांच्या भेटीबाबत शरद पवार अनभिज्ञ असल्याचं समोर आलं आहे. शरद पवार वाय बी सेंटरवर दाखल झाल्यावर माध्यमांचे प्रतिनिधी का जमले आहेत, अशी चौकशी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे केली.

शरद पवारांच्या गटातील आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी दोन वाजता बैठक होती. परंतु ही बैठक सुरु होण्याआधीच अजित पवार गटातील आमदार वायबी सेंटरवर पोहोचले. शरद पवार यांना सर्व आमदार येणार असल्याची कल्पना  नव्हती. शरद पवार येण्याआधी आपण यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन बसावं, अशी अजित पवारांच्या गटाची खेळी होती. परंतु शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरवर दाखल होताच जितेंद्र आव्हाडांकडे माध्यमांचे प्रतिनिधी का जमले आहेत? अशी विचारणा केली. 

अजित पवार आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला 

दरम्यान, अजित पवार त्यांच्या गटातील आमदारांसह आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले. काल (16 जुलै) अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर, आज आमदारही शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. महत्त्वाचं म्हणजे स्वत: अजित पवार, सुनील तटकरे आजही शरद पवारांची भेट घेत आहेत. राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. आज सभागृहाचं कामकाज आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले.  

देवगिरी बंगल्यावरील बैठकीनंतर अजित पवार वाय बी सेंटरवर  

देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री वाय बी चव्हाण सेंटरला पोहोचले हो. अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखीलही तातडीने वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला म्हणून मी लवकर निघालोय. शरद पवारांनी बोलवलंय, लवकर या असं मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. "राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांना दिला," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी कालच्या भेटीनंतर दिली होती.

संबंधित बातमी

मोठी बातमी! अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये  कशेडी घाटात ट्रक उलटला
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये कशेडी घाटात ट्रक उलटला
Chhagan Bhujbal : शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा; शरद पवारांचं कौतुक करत छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला
शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा; शरद पवारांचं कौतुक करत छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला
रशियाच्या व्लादीमीर पुतीन यांचा PM नरेंद्र मोदींना फोन; डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या भेटीचा दिला वृत्तांत
रशियाच्या व्लादीमीर पुतीन यांचा PM नरेंद्र मोदींना फोन; डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या भेटीचा दिला वृत्तांत
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2025 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2025 | सोमवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
Narendra Modi Big Announcement : 12 वर्ष 12 घोषणा, नरेंद्र मोदींच्या घोषणेचा आढावा
Maharashtra LIVE News : 05.00 AM : Superfast News Update : 15 AUG 2025 : ABP Majha
Operation Sindoor | Wagah Border वर Independence Day चा उत्साह, 1971 च्या विजयाची आठवण!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये  कशेडी घाटात ट्रक उलटला
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये कशेडी घाटात ट्रक उलटला
Chhagan Bhujbal : शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा; शरद पवारांचं कौतुक करत छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला
शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा; शरद पवारांचं कौतुक करत छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला
रशियाच्या व्लादीमीर पुतीन यांचा PM नरेंद्र मोदींना फोन; डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या भेटीचा दिला वृत्तांत
रशियाच्या व्लादीमीर पुतीन यांचा PM नरेंद्र मोदींना फोन; डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या भेटीचा दिला वृत्तांत
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2025 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2025 | सोमवार
Vidarbha Rain: विदर्भात मुसळधार पावसाचा कहर!धरणांचे दरवाजे उघडले,पूराच्या पाण्यात जनजीवन ठप्प,कुठे काय परिस्थिती?
विदर्भात मुसळधार पावसाचा कहर!धरणांचे दरवाजे उघडले,पूराच्या पाण्यात जनजीवन ठप्प,कुठे काय परिस्थिती?
Narendra Modi : अमेरिकेच्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक, 7 केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार, दिल्लीत घडामोडी वाढल्या
अमेरिकेच्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक, 7 केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार
CM देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील; महायुतीच्या मंत्र्यांनी दिली माहिती
CM देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील; महायुतीच्या मंत्र्यांनी दिली माहिती
Tiruchi Siva : इंडिया आघाडी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार? तामिळनाडूतील खासदाराचं नाव आघाडीवर, भाजपच्या रणनीतीला उत्तर?
उपराष्ट्रपती निवडणूक बिनविरोध होणं अशक्य? विरोधी पक्षांचा उमेदवार जवळपास निश्चित, अंतिम निर्णय कधी होणार?
Embed widget