एक्स्प्लोर

Narendra Modi : अमेरिकेच्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक, 7 केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार, दिल्लीत घडामोडी वाढल्या

Narendra Modi : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लागू केलं आहे. 27 ऑगस्ट पासून भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू होणार आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेनं भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं आहे.भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिका 25 टक्के नियमित आणि अतिरिक्त 25 टक्के असं एकूण 50 टक्के शुल्क 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी 6.30 वाजता महत्त्वाची बैठक बोलावली आहे. नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह इतर 7 केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.

नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी साडे सहा वाजता पंतप्रधान निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीत अमेरिकेनं भारतावर लादलेल्या टॅरिफ संदर्भात आणि चीनचे विदेश मंत्री वांग यी यांच्या आजपासून सुरु होणाऱ्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्याबाबत चर्चा होऊ शकते. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणलेले असताना भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याची शक्यत आहे.

अमेरिकेनं भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर 1 ऑगस्टपूर्वी 25 टक्के टॅरिफ लागू केलं होतं. त्यानंतर त्यामध्ये 25 टक्क्यांची वाढ केली आहे. भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेनं 50 टक्के आयात शुल्क 27 ऑगस्टपासून आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊन 40 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करार देखील लांबणीवर पडला आहे. सहाव्या फेरीच्या चर्चेसाठी वॉशिंग्टनची एक टीम भारताच्या दौऱ्यावर येणार होती. 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान ही चर्चा होणार होती. मात्र, हा दौरा लांबणीवर गेला आहे.

अमेरिका व्यापारी कराराच्या माध्यमातून कृषी आणि डेअरी क्षेत्र खुलं करण्याची मागणी करत आहे. भारतानं अमेरिकेच्या या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळं भारतानं येत्या काळात स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवण्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना आवाहन केलं होतं.

भारताकडून रशियाकडून तेल खरेदी कायम

अमेरिकेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी आणि शस्त्र खरेदी करत असल्यानं 25 टक्के टॅरिफ लादत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ 25 टक्क्यांनी वाढवलं. दरम्यानच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात चर्चा झाली. या चर्चेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतिन यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं आहे. एकीकडे अमेरिका भारतावर टॅरिफ वाढवत असताना भारत आणि चीन यांच्यातील संबंध पुन्हा सुधारत असल्याचं चित्र आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
Embed widget