देशात पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी म्हणून जनतेची पहिली पसंती कोणाला? अमित शाह की योगी?
Survey on Successor Of PM Modi: देशात महागाई, बेरोजगारी आणि कोरोना महामारी यांसारख्या अनेक समस्या असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम आहे.
Survey on Successor Of PM Modi: देशात महागाई, बेरोजगारी आणि कोरोना महामारी यांसारख्या अनेक समस्या असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान मोदी विरोधी पक्षाच्या नेत्यांपासून खूप पुढे आहेत. एका सर्वेक्षणात जवळपास 53 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पुढील पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी म्हणून गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात तगडी स्पर्धा आहे. सर्वेक्षणादरम्यान यात सहभागी झालेल्या लोकांना भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण? या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्या नावावर जोरदार टक्कर झाली.
मोदींचा उत्तराधिकारी म्हणून पहिली पसंती कोणाला?
पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकारीबाबत देशात अनेकदा चर्चा होत असते. सर्वसामान्यांपासून ते राजकीय वर्तुळात पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी कोण होणार याची चर्चा सुरू आहे. सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकारीबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. या सर्वेक्षणात अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात चुरशीची स्पर्धा दिसून आली. 25 टक्के लोकांनी अमित शाह हे पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी असल्याचं सांगितलं. तर 24 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांना उत्तराधिकारी म्हणून पाठिंबा दिला आहे.
इंडिया टुडे आणि सी व्होटर्सच्या सर्वेक्षणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना 25 टक्के लोकांनी त्यांची पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ हे 24 टक्के लोकांची पसंती दर्शवली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तराधिकारीच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 15 टक्के लोकांनी त्यांची पसंती असल्याचे सांगितले. यासोबतच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना 9 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तसेच 4 टक्के लोकांनी निर्मला सीतारामन यांना पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी पसंती दर्शवली आहे.
सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण?
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना विचारण्यात आले की, देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाच्या उत्तरात सुमारे 40 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्वोत्तम मुख्यमंत्री असल्याचे सांगितले. सर्वेक्षणानुसार अरविंद केजरीवाल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 22 टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली. याशिवाय 9 टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांना सर्वोत्तम मुख्यमंत्री आपली पसंती दर्शवली.
इतर महत्वाची बातमी:
RBI Guidlines : कर्जवसुलीसाठी बँका तुम्हाला धमकावतात? धमक्या देऊ नका... वसुली एजंट्ससाठी RBI ची नवी नियमावली
अखेर कष्टाचे फळ मिलाले, 20 रुपयांसाठी 22 वर्षे लढा, रेल्वेला द्यावी लागणार भरपाई