एक्स्प्लोर

West Bengal : बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय

Kolkata EVM Warehouse Fire Updates : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 10 मतदारसंघांमध्ये वापरण्यात आलेले 4000 ईव्हीएम हे आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. 

कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकातामधून एक अत्यंत धक्कादायक आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. कोलकाता येथील एका नऊ मजली सरकारी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 4000 ईव्हीएम (EVM) जळून खाक झाल्या आहेत. या ईव्हीएम विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं असून, प्रशासनानं या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करून तपास सुरू केला आहे.

दक्षिण कोलकात्याच्या अलीपूर (Alipore) भागात असलेल्या एका सरकारी इमारतीला बुधवारी (10 जून) आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना तब्बल 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागला.

West Bengal Assembly Elections : विधानसभा निवडणुकीत EVM वापर

ज्या नऊ मजली इमारतीला आग लागली, त्यामध्ये इतर सरकारी विभागांशिवाय दक्षिण 24 परगणा जिल्हा परिषदेचं कार्यालय देखील भक्ष्यस्थानी पडलं. बंगाल सरकारमधील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा राज्यमंत्री कौशिक चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत सुमारे 4,000 ईव्हीएम पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत.

विशेष म्हणजे, या जळालेल्या ईव्हीएम मशिन्सचा वापर नुकत्याच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान 10 वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये करण्यात आला होता. या मशिन्स तिथे सुरक्षेसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

Kolkata EVM Fire Suspicious Incident : मंत्र्यांकडून घातपाताचा संशय

घटनेची माहिती मिळताच राज्यमंत्री कौशिक चौधरी यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या अपघातावर मोठा संशय व्यक्त केला. ही कोणतीही सामान्य आग वाटत नाही. यामध्ये काही घातपात किंवा तोडफोड झाली आहे का, याचा आम्ही सखोल तपास करत आहोत. आग सर्वात आधी इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर लागली होती, मग ती थेट नवव्या आणि दहाव्या मजल्यापर्यंत कशी पोहोचली, हे अद्याप अस्पष्ट आहे, असं चौधरी यांनी म्हटलं. 

EVM Warehouse Fire Updates : 24 तासांनंतर आग आटोक्यात, कूलिंगचे काम सुरू

बुधवारी लागलेल्या या भीषण आगीच्या ज्वाळा गुरुवारी सकाळपर्यंत शांत झाल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान अजूनही घटनास्थळी तैनात असून, इमारतीमध्ये कूलिंगची प्रक्रिया राबवली जात आहे.

पश्चिम बंगालमधील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर थेट विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशिन्स जळाल्याने या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही बातमी वाचा :

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Prithviraj Chavan : कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी नावं काढली असती तर कदाचित निकाल वेगळा असता: पृथ्वीराज चव्हाण
कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी लेखी निवेदन दिलेलं पण... : पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget