![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आमच्यावर अन्याय झाला: दीपक केसरकर
Maharashtra Politics Shinde Group: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थानिक लोकांनी गळा काढू नये. मुळात हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. बहुमत असूनही आमचा दावा नाकारला गेला आहे: दीपक केसरकर
![निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आमच्यावर अन्याय झाला: दीपक केसरकर We were wronged by the decision of the Election Commission said Deepak Kesarkar निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आमच्यावर अन्याय झाला: दीपक केसरकर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/8e2aaf455ffa57b7e55453acf1b6d7c41665290100633290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Politics Shinde Group: ''निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थानिक लोकांनी गळा काढू नये. मुळात हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. बहुमत असूनही आमचा दावा नाकारला गेला आहे. त्यांनी सतत फक्त आयोगाकडे तारखा मागितल्या, कागदपत्र सादर केली नाही. त्यामुळे वेळेत निर्णय होऊ शकला नाही'', असं शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाने शनिवारी मोठा निर्णय घेत शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण गोठवले आहे. तसेच शिवसेना हे नाव उद्धव आणि ठाकरे गटाला वापरता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. यावर आज केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटाचं यावर म्हणणं मांडलं आहे.
यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले आहेत की, आजही आमच्या मागणीवर ठाम आहोत. आम्ही प्रतिज्ञापत्र कधी दिली याच्या साऱ्या नोंदी आहेत. आज आमचं चिन्ह गोठवसं गेलं आहे. त्यांनी अन्य पर्याय तयारही ठेवलेत. मात्र आम्ही तसं काहीही केलेलं नाही. ते म्हणाले, तिथं लोकशाही संपते, एकासोबत निवडून आल्यावर दुसऱ्यासोबत जाणं यामुळे लोकशाहीची हत्या होते. आता जी ओरड सुरूय ती केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. बाळासाहेब लोकांच्या सहानुभूतीवर कधीच अवलंबून नव्हते. बाळासाहेबांच्या कौतुकाचा हात नेहमीच शिंदेंच्या पाठीशी होता. म्हणूनच त्यांना त्रास देणं सुरू होतं.
'आम्ही या निकालाविरोधात दाद मागणार'
दीपक केसरकर म्हणाले आहेत की, आम्ही या निकालाविरोधात दाद मागणार. ते म्हणाले, सध्या केवळ सर्वसामान्य शिवसैनिकाला भडकवण्याचं काम सुरू आहे. जुन्या गोष्टी जोडून तोडून दाखवल्या जात आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी त्याला भुलू नये. आता भावनिक पोस्ट टाकताय, त्याऐवजी 2.5 वर्षात लोकांची भेट घेतली असतीत तर आज ही वेळ आली नसती.
अंधेरीतून कोण निवडणूक लढवणार?
यावेळी बोलताना केसरकर यांनी आदित्य ठाकरे याना लक्ष केलं आहे. ते म्हणाले आहेत की, आदित्य ठाकरे रोज खोक्याचं ट्वीट करतायत. कारण त्यांना खोक्याचीच सवय आहे. शब्द त्यांना जवळचा आहे. हे ट्वीट बंद करा, आम्ही त्याला उत्तक देणार नाही. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंनी सत्तेत आल्यानंतर 700 लोकहिताचे निर्णय घेतले. ते दिवसरात्र फिरून काम करत आहेत. अंधेरीतील पोटनिवडणूक बाबत बोलताना ते म्हणाले आहेत की, अंधेरीतून कोण निवडणूक लढवणार याचा अद्याप निर्णय झालेला नाही. तो निर्णय शिंदे आणि फडणवीस एकत्र बसून घेतील. मुरजी पटेलांचं नाव तुम्ही सांगताय, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)