एक्स्प्लोर

Nagarpalika Nagarpanchayat Election 2025 Postponed: नगराध्यक्षपदाच्या 22 अन् 700 हून अधिक नगरसेवकपदाच्या निवडणुकाही पुढे; निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर, आदेशात नेमकं काय काय म्हटलंय?

Nagarpalika Nagarpanchayat Election 2025 Postponed: राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे.

Nagarpalika Nagarpanchayat Election 2025 Postponed: राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका (Nagarparishad Election 2025) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर 700 हून अधिक नगरसेवकपदाच्या निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहे. गेल्या दोन आठवड्यापासून जिथं प्रचाराचा धुरळा उडत होता. तिथं अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलंय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. ज्याठिकाणी निवडणूक पुढे ढकलली तिथं आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. राज्यातील उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळत पार पडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित पत्रकात काय? (Revised leaflet of the State Election Commission)

राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ–20254/स.नि.का./न.प./प्र.क्र.94/का.6, दिनांक 29/11/2025 नुसार, न्यायालयीन अपील व इतर कारणास्तव प्रभावित नगरपरिषदा/नगरपंचायतींसाठी खालील सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जात आहे.

सुधारित निवडणूक कार्यक्रम 2025-

क्र. निवडणुकीचा टप्पा तारीख /वेळ

1. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 04/12/2025
2. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस 10/12/2025 (दुपारी 3:00 वाजेपर्यंत)
3. आवश्यकतेनुसार निवडणूक चिन्हे वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रकाशन 11/12/2025
4. मतदानाचा दिवस (आवश्यक असल्यास) 20/12/2025 (स. 7:30 ते सं. 5:30)
5. मतमोजणी व निकाल जाहीर 21/12/2025 (सकाळी 10:00 पासून)
6. राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख 23/12/2025 पूर्वी कलम 19 मधील तरतुदीनुसार...

मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,

(सुरेश काकाणी)
सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
Nagarpalika Nagarpanchayat Election 2025 Postponed: नगराध्यक्षपदाच्या 22 अन् 700 हून अधिक नगरसेवकपदाच्या निवडणुकाही पुढे; निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर, आदेशात नेमकं काय काय म्हटलंय?

नगरपालिका,नगरपंचायत निवडणुकीचा सावळागोंधळ 

नगराध्यक्षपद-

घोषणा
288

बिनविरोध
3

स्थगित
22

उद्या मतदान
253

22 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांना स्थगिती- (Nagarpalika Nagarpanchayat Election 2025 Postponed)

अमरावती विभाग-
बाळापूर
अंजनगाव सुर्जी
यवतमाळ
देऊळगाव राजा
वाशिम

कोकण विभाग-
अंबरनाथ

छ.संभाजीनगर विभाग-
फुलंब्री 
धर्माबाद
मुखेड
रेणापूर
वसमत

नागपूर विभाग-
घुग्घूस
देवळी

नाशिक विभाग-
देवळाली-प्रवरा
कोपरगाव
पाथर्डी
नेवासा

पुणे विभाग-
बारामती
फुरसुंगी-उरळी देवाची
महाबळेश्वर
फलटण
मंगळवेढा
अनगर

नगरसेवकपदाच्याही निवडणुका स्थगित, आतापर्यंत 731 जागी ब्रेक- (Nagarpalika Nagarpanchayat Election 2025)

अमरावती- 187

छ.संभाजीनगर- 144

पुणे- 143

नाशिक- 120

कोकण- 69

नागपूर- 68

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप- (Devendra Fadnavis On ECI) 

निवडणुकीच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतले आहेत. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय. ते मला माहित नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे.  उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणुक आयोगाला देऊ, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

निवडणूक आयोगाचा बट्ट्याबोळ, VIDEO:

संबंधित बातमी:

Nagarpalika Nagarpanchayat Election 2025 Postponed: राज्यातील 22 नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; आता मतदान अन् मतमोजणी कधी होणार?, A टू Z माहिती

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
Embed widget