Vinod Tawde : मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
Vinod Tawde On Narendra Modi : पहिल्या टप्प्यात आम्हाला अपेक्षित मतदान झालं असून पुढच्या टप्प्यातही असंच समर्थन मिळेल अशी आशा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
मुंबई : राज्यातील विरोधकांचा प्रचार ज्या पद्धतीने चालला आहे तो कुणाच्याही हिताचा नसल्याचं सांगत जनतेनं त्याचा विचार केला पाहिजे असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केलं. मोदींना मत देऊन काय मिळालं असा विरोधक सवाल विचारत आहेत, पण महाराष्ट्राला कराचा सर्वात जास्त वाटा मिळाला आहे, चार कोटी घरांपैकी 27 लाख घरं ही महाराष्ट्राला मिळाली असल्याचा दावाही त्यांनी केला.
मोदींना मत दिले तर काय मिळाले हे सांगतोय, ते सोडून विरोधक काय मुद्द्यांवर टीका करत आहेत, काय पद्धतीने पुढे जात आहोत याचा विचार जनतेने केला पाहिजे असंही विनोद तावडे म्हणाले.
काय म्हणाले विनोद तावडे?
महाराष्ट्राच्या जनतेला या प्रचारापेक्षा मोदी सरकारमधून काय मिळालं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. करवाटपात महाराष्ट्राला मिळालेला अधिकचा वाटा, अनुदानात मिळालेली अधिकची रक्कम हे महाराष्ट्राला मिळालं. महाराष्ट्राला 11 हजार 711 कोटी रुपये बिनव्याजी कर्ज केंद्राने महाराष्ट्राला दिलंय. मोदी सरकारकडून राज्याला काय मिळाले याचा विचार होणे गरजेचे आहे. राज्याला 253 टक्के अनुदानाच्या रूपाने आले याचा जनतेने विचार करायला हवा. आपल्या राज्याची प्रगती कशात आहे याचा विचार व्हायला हवा.
महाराष्ट्राला कराचा सर्वाधिक वाटा
काँग्रेस म्हणत एका बाजूला रोजगार नाही. तर दुसऱ्या बाजूला भाजपने पंतप्रधान आवास योजनेतून चार कोटी घरे बांधली. ही घरे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खिशातून बांधली नाहीत. त्यासाठी लागलेल्या साहित्यात हजारो व लाखो लोकांना रोजगार मिळाला.पीएम आवासमध्ये 27 लाख घरे महाराष्ट्राला दिली आहेत, शौचालय बांधली आहे. आयुष्यमान भारत योजनेत कार्ड दिले आहे, अन्नधान्य दिले जात आहे.
काँग्रेसने 80 वेळा संविधान बदललं
काँग्रेस नेते असे म्हणतात की भाजपला संविधान बदलण्यासाठी 400 पार हवेत. पण काँग्रेसच्या काळात 80 वेळा संविधान बदलण्याचा कार्यक्रम झाला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी आम्ही आमचे संकल्प पत्र जाहीर केले. संविधान समोर ठेवून आम्ही आमचे संकल्प पत्र जाहीर केले. लोकांना संभ्रमित करण्याचे काम काँग्रेसचे राहुल गांधी करत आहेत.
देशभरात लोकसभेचा धुरळा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात भाजपला अपेक्षित मतदान झालंय. आम्ही चागल्या जागा मिळवू. लोकसभेचा राज्यात जो प्रचार सुरू आहे तो राज्याच्या हितासाठी अपेक्षित नाही. कोण नाच्या म्हणतो, कोणी काही म्हणतो हे शोभनीय नाही. अशा राजकीय स्तरावर जाऊन प्रचार करने मनाला वेदना देणारे आहे.
देशात निवडणुकीची धामधूम सुरू आहे, आम्हाला अपेक्षित असलेले मतदान पहिल्या टप्प्यात झालं आहे. महाराष्ट्रात होणारा प्रचार पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की हा प्रचार शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला अभिप्रेत नाही. आज महाराष्ट्रात ज्या स्तरावर प्रचार सुरू आहे, ते मनाला वेदना देणारं आहे.
ही बातमी वाचा: