एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar: एकनाथ शिंदेंची महायुतीला गरज नाही, शिवसेनेला संपवण्यासाठी आता नवा 'उदय' होईल; विजय वडेट्टीवारांनी महायुतीला डिवचलं

Vijay Wadettiwar on Mahayuti : उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपून नवीन 'उदय' पुढे येईल. असे भाकीत करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. 

Vijay Wadettiwar नागपूर : नाराजी दाखवून आपल्या पदरात काही मिळेल का, हा प्रयत्न सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. शिंदे (Eknath Shinde)  यांची गरज संपली का? ते बाजूला व्हावे अशी भीती आहे. उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपून नवीन 'उदय' पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल.  ही शिवसेनेच्या बाबतीतली सध्याची परिस्थिती आहे. किंबहुना उद्याचा शिवसेनेचा नवा उदय होताना तुम्हाला दिसेल, ही शक्यता नाकारता येत नाही, कारण काही उदय दोन्ही तबल्यावर हात मारून आहेत. संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच आहे. असे भाकीत करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे गावाला रवाना झाले आहेत. वैयक्तीक कारणासाठी चार दिवस ते दरे गावी रवाना झाल्याचं बोललं जात आहे. मात्र पालकमंत्रिपद वाटपावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा आहे. या विषयी बोलताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य करत टीका केली आहे. 

"भांडा सौख्यभरे" असे म्हणण्याची वेळ आलीय-विजय वडेट्टीवार

सध्याची ही सगळी परिस्थिती पाहून जनता सरकारला स्थगिती देईल. हा काय सावळा गोंधळ, ड्रामा सुरू आहे. एवढं बहुमत असताना आपसात मतभेद वाढले, सत्तेसाठी पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. शर्मेने मान खाली घालावी, अशी स्पर्धा सुरू आहे. परिणामी  "भांडा सौख्यभरे" असे म्हणण्याची वेळ आली आहे. आज पालकमंत्री बदलायची पाळी आली, परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल..  त्यानंतर मुख्यमंत्री बदलायची वेळ येईल. असे ही विजय वडेट्टीवार म्हणाले. 

हिंदू-मुस्लिम मताची पोळी शेकून सत्तेची मजा- विजय वडेट्टीवार

किरीट सोमय्या यांना आव्हान आहे की, अब्दुल सत्तार मंत्री असताना तुमच्या मुखातून बांगलादेशी बद्दल शब्द का आले नाही. आता मंत्रिमंडळातून ते बाहेर पडताच ते का दिसत आहे. त्यावेळेस तुम्ही का नाही बघितलं. ज्यांच्याकडे साडेसात वर्षापासून गृहमंत्री पद आहे. तुम्ही का थांबवलं नाही? त्यांना मात्र पदापासून दूर केल्यानंतर भाजपकडून नवीन नवीन विषय उघडले जात आहे. मतांचे पोलोरायझेशन करण्यासाठी मंदिर के नीचे मस्जिद धुंडेगे. नितेश राणे कोकणातल्या जमिनीवर बोलले. हिंदू मुस्लिम मताची पोळी शेकून सत्तेचा मजा करत आहे. अशी टीका ही विजय वडेट्टीवार यांनी किरीट सोमय्या यांच्या सिल्लोड दौऱ्यावरुन केली.  असेही 

लाडक्या बहि‍णी याचा  बदला घेईल- विजय वडेट्टीवार

लाडक्या बहि‍णीचं काम झालं, लाडक्या भावानी दाबून खाणे सुरू केलंय. त्यामुळे या बहि‍णीचा त्यांना श्राप लागले, हळू हळू लाभार्थी कमी होईल, बहीण त्याचा बदला घेईल. किंबहुना शेतकरी कर्जमाफी कधी होणार? तिघांचा भांडनात महाराष्ट्र खड्ड्यात जात आहे. अशी टीका ही विजय वडेट्टीवार यांनी केलीय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश
मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
Embed widget