एक्स्प्लोर

Eknath Shinde: पालकमंत्रिपदावरुन महायुतीत खदखद; नाराज एकनाथ शिंदेंच्या मनधरणीसाठी बावनकुळे अन् महाजन हेलिकॉप्टरने दरे गावाला जाणार

Eknath Shinde Dare Gaon Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे गावात रवाना झाले आहेत.

Eknath Shinde Dare Gaon Maharashtra Politics: महायुतीमधील पालकमंत्री पदावरुन (Maharashtra Guardian Ministers List) वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं दिसत आहे. तसेच पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. याचदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) दरे गावाला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे गावात रवाना झाले आहेत. वैयक्तीक कारणासाठी चार दिवस दरे गावी रवाना झाल्याचं बोललं जात आहे. मात्र पालकमंत्रिपद वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी हेलिकॉप्टरने दरे गावाला जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत.  चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांची भेट घेत पालकमंत्रिपदावरुन चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तिघांमध्ये नेमकी कोणती चर्चा होणार?, भेटीत कोणता तोडगा निघणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

नाशिक अन् रायगडवरुन वाद-

रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद असून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तेव्हा रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं. अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड होताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नाराजी दर्शवली होती. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली. त्यामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर करत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली आहे. 

एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. एखनाथ शिंदे यांची गरज संपली का? ते बाजूला व्हावे अशी भीती आहे. उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं. आता एकनाथ शिंदेंना संपून नवीन 'उदय' पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल, असं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. 

एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा, VIDEO:

संबंधित बातमी:

गिरीश महाजन यांचं नाशिकचं पालकमंत्रिपद जाताच शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, दादा भुसे यांना....

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
Babanrao Taywade : मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आकडेवारी मराठा अन् ओबीसी दोन्ही समाजाची दिशाभूल करणारी; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा गंभीर आरोप
मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आकडेवारी मराठा अन् ओबीसी दोन्ही समाजाची दिशाभूल करणारी; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा गंभीर आरोप
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Ind vs Nz Final Pitch Report : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
Arjun Tendulkar : लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लेकाने सीफेसिंग फ्लॅट विकला, 15 दिवसातंच बिग बींची आयोध्येत मोठी गुंतवणूक; रामजन्मभूमीत किती कोटींची डील?
लेकाने सीफेसिंग फ्लॅट विकला, 15 दिवसातंच बिग बींची आयोध्येत मोठी गुंतवणूक; रामजन्मभूमीत किती कोटींची डील?
Vishwas Patil : ‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
Embed widget