एक्स्प्लोर

ठरलं! रात्रीच आदेश निघाला, सेंट्रल हॉलमध्ये शपथविधीची लगबग सुरु; आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे 7 नेते होणार आमदार

राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांचा शपथविधी आज पार पडणार आहे. तर रिक्त पाच जागा या इच्छुकांना आशेवर झुलवत ठेवण्याासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

मुंबई : राज्यातल्या विधानसभेसाठी मंगळवारी आचारसंहिता लागणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीची तयारीही सुरू असल्याची माहिती आहे. दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलला सात आमदारांचा शपथविधी होणार आहे.  विधीमंडळतात उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे. सध्या  विधीमंडळात शपथविधीची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांकडे सोमवारी फाईल पाठवण्यात आली. त्यानंतर रात्री उशीरा राज्यपालांनी याला मंजुरी दिली आहे.

भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने संधी दिली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येत आहे.  राष्ट्रवादीकडून  पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. आज हे सातही आमदार शपथ घेणार आहेत. 

 एकनाथ शिंदे यांच्याकडून हेमंत पाटील, मनीषा कायंदे यांचं पुनर्वसन

 एकनाथ शिंदे यांच्याकडून हेमंत पाटील, मनीषा कायंदे यांचं पुनर्वसन  करण्यात आले आहे.  मनीषा कायंदे यांची नुकतीच टर्म संपली होती. आथा त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.  हेमंत पाटील यांची उमेदवारी भाजपच्या दबावामुळं रद्द करावी लागली होती.  शिंदेंकडून आणखी एका माजी खासदाराला विधानपरिषदेवर स्थान  देण्यात आले आहे.   यापूर्वी भावना गवळींना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली आहे.  

पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाच्या नेत्याला संधी

तर दुसरीकडे  अजित पवार यांच्याकडून सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न  करण्यात आला आहे.  पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी  यांना आमदारकी  देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाच्या नेत्याला संधी  देण्यात आली आहे.  सांगलीचे  माजी महापौर म्हणून इद्रिस नायकवडी यांनी काम केले आहे. तर   पंकज भुजबळ यांना संधी देत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला आहे.   यापूर्वी सुनेत्रा पवार आणि नितीनकाका पाटील यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे.    त्यामुळं विधानपरिषदेवर ओबीसी आणि मुस्लीम नेत्याला संधी देण्यात आली आहे.

हे ही वाचा :

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 जणांची नावं ठरली, विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणाकोणाला लॉटरी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Embed widget