एक्स्प्लोर

Vasant More: सुजात आंबेडकरांची 'ती' दोन वाक्य ऐकून मी भरुन पावलो; वसंत मोरेंनी सांगितला राजगृहावर घडलेला किस्सा

Maharashtra Politics: फक्त तात्यांना भेटण्यासाठी सुजात आंबेडकर विमानाने मुंबईला आले. राजगृहावर प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर सुजात आंबेडकर वसंत मोरे यांना काय म्हणाले? राजगृहावर नेमकं काय घडलं?

पुणे: वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी रात्री लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी प्रसिद्ध केली. या उमेदवार यादीत 5 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये पुण्यातून मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. वसंत मोरे (Vasant More) यांच्या रुपाने वंचितने पुणे लोकसभेच्या रिंगणात तगडा उमेदवार  रिंगणात उतरवल्याची चर्चा आहे. वंचितकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. यावेळी वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या मुंबईतील 'राजगृह' या निवासस्थानी घडलेला एक किस्सा सांगितला. 

वसंत मोरे हे साधारण आठ दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांना भेटण्यासाठी मुंबईतील त्यांच्या घरी गेले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीवर सुजात आंबेडकरही वसंत मोरे यांना भेटले होते. सुजात आंबेडकर हे त्यादिवशी फक्त वसंत मोरे यांना भेटण्यासाठी अकोल्याहून तातडीने मुंबईत आले होते. याविषयी सांगताना वसंत मोरे यांनी म्हटले की, मी प्रकाश आंबेडकर यांच्या घरी गेलो होतो तेव्हा आमच्यात तासभराची प्रदीर्घ चर्चा झाली. त्या चर्चेत प्रकाश आंबेडकर यांनी मला राजकारणाचे कंगोरे समजवून सांगितले. माझ्याशी ते तासभर पुणे शहराच्या संपूर्ण कामाविषयी बोलत होते. ही चर्चा संपल्यानंतर मी बाहेर पडलो तेव्हा मला सुजात आंबेडकर भेटले. ते मला पाहून म्हणाले की, मी आज अकोल्यात होतो. मी अकोल्याहून रस्तेमार्गे छत्रपती संभाजीनगरला आणि तेथून विमानाने मुंबईला फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. यानंतर सुजात आंबेडकर यांनी उच्चारलेली वाक्यं माझ्या 15 वर्षांच्या कामाचा गौरव करणारी होती. सुजात आंबेडकर यांनी म्हणाले की, तात्या मी पुणेकर आहे, पुण्यात माझी दोन मतं आहेत. माझं भाग्य आहे की, ही दोन मतं तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला देता येतील. सुजात आंबेडकर यांची ही दोन वाक्यं ऐकून मी भरुन पावलो, असे वसंत मोरे यांनी म्हटले.

वंचितच्या तिसऱ्या उमेदवारी यादीत कोणती नावे? 

वंचित बहुजन आघाडीच्या तिसऱ्या लोकसभा उमेदवारीच्या यादीत एकूण 5 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्येही उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. नांदेडमधून वंचितने अविनाश भोसीकर (लिंगायत), परभणीतून बाबासाहेब उगले (मराठा), औरंगाबादमधून अफसर खान (मुस्लीम), पुण्यातून वसंत मोरे (मराठा) आणि शिरुरमधून मंगलदास बांदल (मराठा) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आणखी वाचा

अखेर तात्यांनी डाव टाकलाच, वंचितकडून पुणे लोकसभेची उमेदवारी; मोहोळ आणि रवींद्र धंगेकरांना घाम फोडणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात तापमान घसरणार: IMD
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे काय साधणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Kurla Bus Accident: संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Embed widget