एक्स्प्लोर

'मविआ'शी काडीमोड, जरांगेंशी तिसरी आघाडी, उमेदवारांची अदलाबदल, वंचितच्या राजकीय भूमिकेत 'केमिकल लोचा'

Vanchit Bahujan Aaghadi and Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या भूमिका सातत्याने बदलत आल्या आहेत.

Vanchit Bahujan Aaghadi and Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या भूमिका सातत्याने बदलत आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये वंचितच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत आणि जागावाटपावरुन वाटाघाटी सुरु होत्या. त्यानंतर मविआ आणि वंचितमधील जागावाटपाचा तिढा शेवटपर्यंत काही सुटला नाही. प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) वंचित मविआची आघाडी होणार नाही, असं स्पष्ट केलं. मात्र, तरिही त्यांनी काँग्रेसच्या काही उमेदवारांना पाठिंबा दिला तर बारामती सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पाठिंबा जाहीर केला. दरम्यान एवढचं नाही तर घाईगडबडीत वंचितने अनेक मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आणि त्यानंतर जाहीर केलेले उमेदवार ऐनवेळी बदलूनही टाकले, त्यामुळे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या मनात चाललय तरी काय? याचा अंदाज लावणे राजकीय जाणकारांनाही अवघड झाले आहे. 

वंचितमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

वंचित बहुजन आघाडी स्वत:च्या राजकीय भूमिकेबाबत गोंधळात असल्याचे चित्र आहे.  अमरावती, यवतमाळ, रामटेक आणि परभणीत जाहीर केलेले उमेदवार प्रकाश आंबेडकरांनी  ऐनवेळी बदलले. अमरावतीत प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्यावरून गोंधळ पाहिला मिळतोय.  सरतेशेवटी आनंदराज आंबेडकरांसह वंचितनंही अमरावतीतून घेतलेली माघार घेतली. त्यामुळे वंचितच्या राजकीय भूमिकेत 'केमिकल लोचा' कशामुळे झालाय असा प्रश्न विचारला जातोय. 

प्रत्येक बैठकीत प्रस्तावाचे आकडे वेगळे

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी काही आठवड्यांपासून वंचितच्या मविआमध्ये सामील होण्याच्या चर्चा सुरु झाल्या. वंचित आणि मविआमध्ये मॅरेथॉन बैठकाही पार पडल्या. मात्र,   प्रत्येक बैठकीत प्रस्तावाचे दोन्हीकडून आलेले आकडे वेगवेगळे असायचे. यातून उडालेला गोंधळ अन सरतेशेवटी वंचित आणि मविआचा झालेला काडीमोड आपण सर्वांनी पाहिलाय. 

उमेदवारांच्या अदलाबदलीवरुन गोंधळ 

वंचित आणि मविआतल्या राजकीय नाट्याचा पहिला अंक संपलाय. आता दुसरा अंक रंगतोय.  सध्या वंचितमध्ये उडालेला राजकीय गोंधळ चर्चेचा विषय ठरलाय.  वंचित बहुजन आघाडीने आता पर्यंत 25 उमेदवार जाहीर केलेत. मात्र, अनेक उमेदवार बदलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. वंचितचा उमेदवार नेमका कोण? यावरुनही संभ्रम निर्माण झालाय. वंचितने कोल्हापूर आणि नागपूर येथे काँग्रेसला पाठिंबा दिलाय. तर बारामतीत  शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिलाय. मात्र, यातील  रामटेक, अमरावती, परभणी आणि यवतमाळ या लोकसभेतील आधी घोषित केलेले उमेदवार वंचितनं ऐनवेळी बदलले आहेत. 

वंचितने कुठे-कुठे बदलले उमेदवार ?

मतदारसंघ       आधी                आता
रामटेक           शंकर चहांदे        किशोर गजभिये
अमरावती      प्राजक्ता पिल्लेवान  आनंदराज आंबेडकर
यवतमाळ       सुभाष पवार         अभिजीत राठोड
परभणी         बाबासाहेब उगले    पंजाब डख 

रामटेकमध्येही पक्षाचं चिन्ह पूर्वी जाहीर केलेल्या उमेदवाराला 

वंचितचा पहिला गोंधळ रामटेकमध्ये उडालाय. रामटेकमध्ये वंचितचा 'एबी फॉर्म' आपल्याकडेच असल्याचा दावा शंकर चहांदे आणि किशोर गजभियेंनी केला होता. यानंतर वंचितने शंकर चहांदे पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले. परंतु, ऐनवेळी येथे चहांदेंची उमेदवारी रद्द करीत तेथे काँग्रेसचे बंडखोर असलेले अपक्ष उमेदवार किशोर गजभियेंना पाठिंबा जाहीर केलाय. आता रामटेकमध्ये वंचितचं अधिकृत चिन्ह 'सिलेंडर' हे आधीच 'एबी फॉर्म' मिळालेल्या शंकर चहांदेंना मिळणार आहे. 

आंबेडकरांच्या भूमिकेमुळे दुसरे आंबेडकर अडचणीत

वंचितनं सर्वात मोठा गोंधळ उडवला तो अमरावती लोकसभा मतदारसंघात 'मामाचं पत्र हरवलं' या बालपणीच्या खेळासारखी पत्र समोर आली. या गोंधळात एका आंबेडकरांच्या भूमिकेमुळे दुसरे आंबेडकर अडचणीत आले. आपण अमरावतीतून लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांचे लहान बंधू आनंदराज आंबेडकरांनी जाहीर केलं होतंय. त्यानंतरही वंचितनं तेथे प्राजक्ता पिल्लेवान या तरूणीच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केलीय. 

आनंदराज आंबेडकरांनी अमरावतीत उमेदवारीही दाखल केलीय. त्यांच्याकडून याकाळात वंचितच्या पाठिंब्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आलेत. शेवटी पाठींबा मिळत नसल्याने त्यांनी माघार घेत असल्याची घोषणा केलीय. मात्र, काल 4 एप्रिलला उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अमरावतीतील उमेदवार प्राजक्ता पिल्लेवान अकोल्यात आंबेडकरांच्या घराबाहेर दोन तास ताटकळत होत्या. अखेरपर्यंत त्यांना उमेदवारी दाखल करण्यास ग्रीन सिग्नल मिळाला नाही. अखेर तिथे वंचितने आनंदराज आंबेडकरांना पाठींबा दिल्याची पत्राद्वारे घोषणा केलीय. आता अमरावतीत वंचितचा उमेदवार नाहीय. तर पाठींबा दिलेले आनंदराज सध्या माघार घेण्यावर ठाम आहेत. 
 
उमेदवारी अर्ज छाननीत रद्द 

परभणीत आधी 2019 चे उमेदवार आलमगीर खान यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा असतांना ती ऐनवेळी बाबासाहेब उगलेंना दिली गेली. त्यानंतर आलमगीर खान यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर वंचितने उगलेंची उमेदवारी बदलत अपक्ष उमेदवार असलेले हवामानतज्ञ पंजाब डख यांना पाठींबा दिलाय. तर यवतमाळमध्ये आधी जाहीर केलेले उमेदवार सुभाष पवार यांची उमेदवारी प्रकृतीचे कारण देत बदलली आहे. ऐनवेळी घोषित केलेले उमेदवार अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्जच छाननीत रद्द झाल्याची नामुष्की वंचितवर ओढवली आहे. लोकसभा निवडणुक वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय भवितव्याचा निकाल लावणारी आहे. पक्षात प्रकाश आंबेडकरांनंतर सुजात आंबेडकरांचं भविष्यातील नेतृत्व उदयाला येत असतांना पक्षाचं चाचपडणं त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरू शकत.

इतर महत्वाच्या बातम्या  

Yavatmal Washim Lok Sabha: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितला मोठा धक्का! अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget