एक्स्प्लोर

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठवला राजीनामा

Uttrakhand Political Crisis: तीरथसिंग रावत यांनी आपल्या राजीनाम्यात लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 191 एचा हवाला देत म्हटले आहे की, येत्या 6 महिन्यांत मी निवडून येऊ शकत नाही.

Uttrakhand Political Crisis: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी आपला राजीनामा भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठवला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्यात लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 191 ए चा हवाला दिला आहे. ते म्हणाले की, आगामी 6 महिन्यांत मी पुन्हा निवडून येऊ शकत नाही.

जेपी नड्डा यांना पाठवलेल्या पत्रात, तीरथसिंग रावत म्हणाले की, "6 महिन्यांत मी पुन्हा निवडून येऊ शकत नाही. हा घटनात्मक पेच आहे. म्हणून आता मला पक्षासमोर अडचणी निर्माण करायच्या नाहीत आणि मी माझा राजीनामा देत आहे, तुम्ही माझ्या जागी कोणाचीही निवड करा."

मुख्यमंत्री रावत यांनी राजीनामा देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी उत्तराखंडच्या राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. असे सांगितले जात आहे की तीरथसिंग रावत राज्यपालांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर अधिकृतपणे राज्यपालांना आपला राजीनामा देतील.

तीरथसिंग रावत यांना का हटवले जात आहे?

  • विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी पोटनिवडणुका होणार नाहीत.
  • पुढील वर्षी जानेवारीत विधानसभा निवडणुका जाहीर होतील.
  • तीरथसिंग रावत अद्याप कोणत्याही सभागृहात सदस्य नाहीत.
  • मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी 6 महिन्यांच्या आत कोणत्याही सभागृहाचे सभासद होणे आवश्यक आहे.
  • तीरथसिंग रावत यांना 10 मार्च 2021 रोजी मुख्यमंत्री केले गेले आणि ते फक्त 10 सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्री राहू शकतात.
  • घटनात्मक परिस्थितीमुळे त्यांचे जाणे निश्चित होते.
  • मुख्यमंत्री असताना तीरथ सिंग यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली.

पुढील मुख्यमंत्री कोण असतील?
उत्तराखंडमध्ये भाजपला हाय कमांड कोण बनवायचे हे वेळच सांगेल, पण आता चार नेत्यांची नावे पुढे येत आहेत. यामध्ये सतपाल महाराज, रेखा खंडूरी, पुष्करसिंग धामी आणि धनसिंग रावत यांचा समावेश आहे. यावेळी राजकीय कॉरिडॉरमध्ये या सर्व नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget