एक्स्प्लोर

Uttamrao Jankar: हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळीही झापूक झुपूकचा गजर, शरद पवारांसमोर जानकरांची फटकेबाजी, भरणेंना म्हणाले, हा तर उंदीरमामा

harshvardhan patil: हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी घोषणेचा गजर. इंदापुरात शरद पवार गटाचं जोरदार शक्तीप्रदर्शन

इंदापूर: लोकसभा निवडणुकीच्या काळात इंदापुरात आमच्या सभांना गर्दी होत नव्हती. पण मतदानावेळी जनतेने दाखवून दिले. परंतु, आता हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत मला खात्री झाली आहे. त्यांचा झापूक झुपूक विजय होईल, असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर (Uttamrao Jankar) यांनी केले. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी सोमवारी इंदापूर येथे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी उत्तम जानकर यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी करत आमदार दत्ता भरणे आणि महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

महायुती सरकारमधील नेत्यांनी मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आश्वासन पाळलं नाही. आता महायुतीचे नेते शरद पवार हे मराठा आणि धनगर आरक्षण देणार का, असे विचारायला सांगतात. अरे तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्ही सरकार चालवताय ना, तुम्ही सरकारमध्ये कशाला बसला आहात. सरकार चालवायलाही अंगात अक्कल लागते, असा टोला उत्तम जानकर यांनी लगावला. 

यावेळी उत्तम जानकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. शरद पवार यांनी प्रत्येक तालुक्याचा अभ्यास करुन नियोजन केले आहे. हर्षवर्धन पाटील, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करु. याठिकाणची मालपाणी पार्टी नीरा नदीत बुडवू, असे जानकर यांनी म्हटले.

जानकरांनी दत्तात्रय भरणेंना उंदीर म्हणून हिणवलं

या सभेत उत्तम जानकर यांनी अजितदादा गटाचे आमदार दत्ता भरणे यांच्यावर टीकास्त्र सोडले. इंदापुरात आजच विजयी सभा बोलावली आहे, असं वातावरण आहे. मामावर साहेबांनी बुलडोझर फिरवला. साहेब मला मंत्री करणार होते पण तुमच्या उंदीर मामा मंत्री झाला. दत्ता भरणे यांनी आमच्या जिल्ह्यात 5 रुपये दिले नाहीत. मात्र, इंदापूरमध्ये 5 हजार कोटी निधी दिला आणि पाच टक्के कमिशन गोळा केला. भरणे यांनी 250 कोटी कमिशन घेतलं, असा आरोप जानकर यांनी केला.

जानकर यांनी भाजप नेते अमित शाह यांच्यावरही हल्ला चढवला. त्यांनी अमित शाह यांचा उल्लेख अली अहमद शहा असा केला. आपण औरंगजेबालाही महाराष्ट्रातच गाडला. अमित शाह यांनाही इकडे गाडू, असे जानकर यांनी म्हटले.

आणखी वाचा

हर्षवर्धन म्हणाले, फडणवीसांनी शक्य ती मदत केली, आता त्यांच्याच राष्ट्रवादी प्रवेशावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget