एक्स्प्लोर

Unmesh Patil : लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंसाठी भाजपशी भिडले, आता उन्मेश पाटलांना एबी फॉर्म, पत्नीला अश्रू अनावर

Unmesh Patil : ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांना चाळीसगाव विधानसभेसाठी एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे.

Unmesh Patil, जळगाव : लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते भाजपमध्ये किंवा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत होते. अशा जळगावमधून तत्कालीन भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरेंना अनेक नेते सोडून जात असताना उन्मेश पाटलांना जळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपशी दोनहात केले होते. दरम्यान, संकटकाळात साथ देणार्‍या उन्मेश पाटलांना आता ठाकरेंच्या शिवसेनेने एबी फॉर्म दिल्याची माहिती आहे. ठाकरेंनी आम्हाला एबी फॉर्म दिल्याची प्रतिक्रिया उन्मेश पाटील यांचे वडिल भैय्यासाहेब पाटील यांनी एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. दरम्यान, यावेळी उन्मेश पाटलांच्या पत्नीला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.

उन्मेश पाटलांचे वडिल काय काय म्हणाले? 

उन्मेष पाटील यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करुन एबी फॉर्म दिली आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे. एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात दुःख आहे. वास्तविक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची जागा असताना राजीव देशमुख यांनी मोठे मन करून उमेदवारी मिळवून दिली. त्यांचे मी आभार व्यक्त करेन असं भैय्यासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीत उन्मेश पाटलांचं तिकीट भाजपने कापलं होतं. त्यानंतर ते संजय राऊत यांच्याशी संपर्क करत ठाकरेंच्या शिवसेनेत आले होते. त्यामुळे ऐननिवडणुकीच्या काळात ठाकरेंना दिलेली साथ उन्मेश पाटलांना फायद्याची ठरल्याचे बोलले जात आहे. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत चाळीसगावमध्ये लढत कशी झाली?

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मंगेश चव्हाण यांनी बाजी मारली होती. त्यांनी 86515 मतं मिळवली होती. मात्र,2019 मध्ये उन्मेश पाटलांनी लोकसभेत विजय मिळवल्यामुळे ते विधानसभा निवडणुकीत उतरले नाहीत. यापूर्वी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत उन्मेश पाटील 94 हजार मतं मिळवून विजयी झाले होते. त्यामुळे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात उन्मेश पाटलांचा प्रभाव असल्याचे बोलले जाते. 

एबी फॉर्म मिळाल्यानंतर उन्मेश पाटलांच्या पत्नीला अश्रू अनावर 

उन्मेश पाटलांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी संपदा पाटील यांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. शिवाय, संपदा पाटील यांनी उमेदवारी निश्चित झाल्याने आनंदही व्यक्त केला. "2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला निवडून आणण्यासाठी आम्ही कष्ट घेतले होते. उन्मेश पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपची सत्ता आणली होती. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाजातील उच्च शिक्षित तरुणीला भाजपने नाकारले. कट कारस्थान करुन घात केला", असंही संपदा पाटील म्हणाल्या. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Madha Vidhansabha Election : माढ्यात मोठा ट्वीस्ट, बबनदादा शिंदेंचा युटर्न; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार जवळपास निश्चित

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates:सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Congress on Ram Mandir: मल्लिकार्जुन खर्गे अन् राहुल गांधींचे पंतप्रधानांना पत्र; म्हणाले, राम मंदिर चोरीच्या प्रकरणात सरकारचे मौन हे गुन्ह्यासमान; सखोल चौकशीच्या मागणीसह पत्रात नेमकं काय?
मल्लिकार्जुन खर्गे अन् राहुल गांधींचे पंतप्रधानांना पत्र; म्हणाले, राम मंदिर चोरीच्या प्रकरणात सरकारचे मौन हे गुन्ह्यासमान; सखोल चौकशीच्या मागणीसह पत्रात नेमकं काय?
Eknath Khadse and Girish Mahajan: एकनाथ खडसेंच्या पीएची गिरीश महाजनांच्या घरी जाऊन हात जोडून विनंती, मान डोलवत म्हणाले...
एकनाथ खडसेंच्या पीएची गिरीश महाजनांच्या घरी जाऊन हात जोडून विनंती, मान डोलवत म्हणाले...
Nana Patole: राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो, वेळेच्या पुढे आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण करत नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य
राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो, वेळेच्या पुढे आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण करत नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
Pune Crime Ravindra Dhangekar: खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
Embed widget