एक्स्प्लोर

बाहेरुन आलेल्यांवर नाराज आहात का?; अमित शाहांनी प्रश्न विचारताच भाजप कार्यकर्त्यांनी स्टेजवर बसलेल्या अशोक चव्हाणांकडे थेट बोट दाखवलं

मराठवाड्यातील 30 जागांवर महायुतीच्या विजयाचा अमित शाह यांचा दावा

Amit Shah: 2017 मध्ये पटेल आंदोलनच्या काळात आम्हाला गावोगावी येऊ दिले जात नव्हते. नकारत्मकता होती सगळेकडे. पण तेव्हा केवळ रणनीतीच्या आधारे आम्ही विरोधकांच्या तोंडचा घास काढून घेतला हाेता. कृषी मालांचे भाव, मराठा आंदोलन किंवा अन्य सर्व चिंता तुम्ही राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांवर सोडा, तुम्ही फक्त मतदान केंद्राची वर्गवारी करुन दहा टक्के मतदान वाढवा, पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम राबवा मराठवाड्यातील 30 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मनाशी बाळगा, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सांगितले.

असंभवला संभव करणे हे भाजपचे काम आहे. निवडणुका जोशमध्ये नाही तर रणनीतीने लढविल्या जातात. मराठा आंदोलनाची, दलित किंवा शेतकरी नाराजींबाबतची मते याची आम्हाला कल्पना आहे. फक्त कार्यकर्त्यांनी तोंड पाडून काम करू नये. लोकसभा निवडणुकीमध्ये विजय भाजपचाच झाला आहे. पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी बसले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरु नंतर तेच एकमेव सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे राहुल गांधीच्या प्रभावात आला आहात का, असा सवाल अमित शहा यांनी केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी उत्तर म्हणून ‘ पप्पू, पप्पू’ असे म्हणत शहा यांच्या वक्तव्याला उत्तर दिले.

आता 17-18 राज्यात भाजपची सत्ता-

45 टक्के मते असणारा एक पक्ष असेल आणि दुसरा 55 टक्के मते असणारा पक्ष असेल तर जिंकणारा पक्ष 55 टक्के मते घेणारा असेल असा आपला समज होतो. पण 55 टक्के मते असणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांनी जर 70 टक्के मतदान करुन घतले आणि 45 टक्के मते असणाऱ्यांनी 90 टक्के मतदान करुन घेतले तर निवडून येणारा पक्ष 45 टक्क्यांचा असतो. त्यामुळे जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे शहा म्हणाले. असंभव बाबीच संभव करणे म्हणजे भाजप, हे ब्रीद लक्षात घेऊन काम करावे लागणार आहे. पूर्वीही भाजपने असेच काम केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनसंघाचा ‘ दिवा’ हाती घेऊन काँग्रेसने निवडलेला रस्ता चुकीचा आहे हे सांगत दोन जण निवडून आले होते तेव्हाही टर उडवली जायची. पण आता 17-18 राज्यात भाजपची सत्ता आहे, असे शहा यांनी आवर्जून सांगितले.

महाराष्ट्र, झारखंड व ओरिसाची निवडणूक मनोबल वाढवणारी-

एखाद्या निवडणुकीचा प्रभाव एखाद्या जिल्ह्यावर पडतो किंवा एखाद्या राज्यावर. पण येणारी भाजपची निवडणूक ही भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढणारी व ‘ यु टर्न ’ घेणारी असल्याने या निवडणुकांकडे कार्यकर्त्यांनी गंभीरपणे पाहण्याची गरज असल्याचे अमित शहा म्हणाले. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर पडेल, त्यामुळे आता मतभेत विसरून आणि न रुसता कामाला लागण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

तुम्ही काळजी करू नका- अमित शाह

निवडणुकीपूर्वी करायच्या कामांमध्ये उद्धव ठाकरे गटातून तसेच शरद पवार यांच्या पक्षात काम करणाऱ्या नाराज कार्यकर्त्यांना जोडून घ्या, असा सल्ला अमित शहा यांनी दिला. बाहेरुन पक्षात घेतल्यामुळे भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे ना? या शहा यांच्या प्रश्नावर सर्वांनी हो असे उत्तर दिले. त्यावर शहा यांनी नवा प्रश्न विचारला या सभागृहात 15 वर्षांपेक्षा किती कार्यकर्ते काम करत आहेत, त्यांनी हात वर करावे. अनेकांनी हात वर केले. आता यातील अनेकांना गेल्या 15 वर्षात काही दिले नाही. ज्यांना 15 वर्षे काम केले त्यांना काही मिळाले नाही तर काल आलेल्या कार्यकर्त्यांना किती दिले जाईल. तुम्ही काळजी करू नका, असे ते हसत म्हणाले. तेव्हा सभागृहातील काही जण व्यासपीठावर बसलेल्या अशोक चव्हाण यांच्याकडे आवर्जून बोट दाखवत होते.

संबंधित बातमी:

Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा'; देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Sharad Pawar on Maharashtra Election : इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
Pune Metro: PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vare NivadNukiche : वारे निवडणुकीचे, राज्यातील राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा ABP MajhaAsaduddin owaisi on Devendra Fadnavis : ... यांना कोर्टावर विश्वास नाही का? ओवैसींचा फडणवीसांवर निशाणाABP Majha Headlines : 06 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Rain : पुण्यात मुसळधार पाऊस, अनेक भागात साचले पाणी, परिस्थिती कशी पाहा व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Sharad Pawar on Maharashtra Election : इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
Pune Metro: PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
PM Modi Pune Visit: पुण्यात मुसळधार पाऊस! उद्या पंतप्रधानांची सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा व्हिडिओ
पुण्यात मुसळधार पाऊस! उद्या पंतप्रधानांची सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा व्हिडिओ
देशाच्या कोणत्याच भागाला पाकिस्तान म्हणता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने फटकारताच न्यायमूर्तींचा डबल माफीनामा; महिला वकिलावरही अश्लील कमेंट
देशाच्या कोणत्याच भागाला पाकिस्तान म्हणता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने फटकारताच न्यायमूर्तींचा डबल माफीनामा; महिला वकिलावरही अश्लील कमेंट
लाचखोर निलंबित IAS अधिकारी अनिल रामोड यांची पुन्हा नियुक्ती; शासनाने दिली मोठी जबाबदारी
लाचखोर निलंबित IAS अधिकारी अनिल रामोड यांची पुन्हा नियुक्ती; शासनाने दिली मोठी जबाबदारी
Embed widget