एक्स्प्लोर

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी जाणून घेतली मराठा आंदोलनाची माहिती; विनोद तावडे यांच्याशी मुंबईत चर्चा, बैठकीत नेमकं काय ठरलं?

Amit Shah in Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. सध्या मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबतही अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

Amit Shah in Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. का (शुक्रवारी) रात्री त्यांचं आगमन झालं. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अमित शाह हे आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे. यासह ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भाजपचे विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील मराठा आरक्षणासह, बिहार निवडणूक आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. सध्या मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबतही अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय ठरलं आणि सध्या सुरु असलेल्या आंदोलनावर काही तोडगा निघाला का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस

दुसरीकडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी मराठा आरक्षणासाठी कापासून मुंबईच्या आझाद मौदानावर आमरण उपोषण सुरु केलं आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावे असं जरांगे पाटील म्हणाले. उपोषणाला एकेक दिवस मुदवाढ देण्यापेक्षा कायमस्वरुपी दिली तरीही हे उपोषण निर्णय होईपर्यंत सुरु राहणार असल्याचे जरांगे म्हणाले. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा महत्वाचा मनाला जातोय. परिणामी यावर काही तोडगा निघून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा स्वागतासाठी अंधेरीनगरी सज्ज

सध्या मुंबईच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अंधेरीत पहिल्यांदा गणपती मंडपात बाप्पाचे दर्शनासाठी येत असल्यामुळे अंधेरीकरांमध्ये मोठा उत्साह आहे. अमित शाह शनिवारी दुपारी दीड वाजता अंधेरी पूर्वेत ओल्ड नागरदास रोडवर असलेल्या मोगरेश्वर सार्वजनिक गणपती मंडपात विराजमान बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मागील 30 ते 35 वर्षापासून गुजरात राज्याचे राज्यमंत्री पुरुषोत्तम भाई सोलंकी यांच्याकडून गणपती बाप्पा विराजमान होत आहे. मोगरेश्वर गणपती मंडपात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची कालपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल आणि पुरुषोत्तम भाई सोलंकी गुजरात राज्याचे राज्यमंत्री यांच्या प्रयत्नाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणपती बाप्पाचे दर्शनासाठी पहिल्यांदा अंधेरीत येत आहेत.

ही बातमी वाचा:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget