एक्स्प्लोर

Deepak Kesarkar : मोदींसोबत असलेले संबंध जपण्याला ठाकरेंची तयारी होती, पण राणेंना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं ठाकरे नाराज; केसरकरांचा गौप्यस्फोट

Deepak Kesarkar on BJP Shivsena Alliance : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेची भाजपसोबत युती का तुटली, याबाबत गौप्यस्फोट केला आहे.

Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेनेचे (Shivsena) भाजपसोबत (BJP) संबंध का तुटले, याबाबत गौप्यस्फोट केला आहे. पंतप्रधान मोदींसोबत (PM Narendra Modi) असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तयारी होती, पण नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले, असा गौप्यस्फोट दीपक केसरकरांनी केला आहे. आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) बदनामी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करायचं ठरवलं होतं, असंही केसरकरांनी सांगितलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर आमदार कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरु होते.

'भाजप आणि शिवसेनेत बोलणी सुरु असताना भाजपच्या 12 आमदाराचं निलंबन झालं. यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संबंध बिघडले. यानंतर नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. यावर उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे अनेक शिवसेना कार्यकर्तेही नाराज झाले. राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांची बदनामी केली. भाजप आणि शिवसेनेतील संबंध सुधारण्याची उद्धव ठाकरेंची तयारी होती. पण नंतरच्या काळात वेळेअभावी ते झालं नाही आणि संबंध आणखी बिघडले', असं केसरकरांनी सांगितलं. 

केसरकरांनी सांगितलं की, 'एकनाथ शिंदेसह इतर आमदार भाजपसोबत युती करण्यासाठी तयार होते. यासाठी उद्धव ठाकरेंकडे मागणीही केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.' त्यानंतर शिंदे गट गुवाहटीला पोहोचल्यावरही शिवसेना आणि भाजपमध्ये बोलणी सुरु होती. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून भाजपसोबत युती करण्याला उद्धव ठाकरेंची तयार होती, असा गौप्यस्फोटही केसरकरांनी यावेळी केला. पण भाजपला हे मान्य नव्हतं. याशिवाय शिवसेना आमदारांनाही हे मान्य नव्हतं. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला हे आपल्याला माहित आहे, असंही केसरकर म्हणाले.

 शिवसेना राहिली पाहिजे असं आमचं मत आहे मात्र कार्यकर्त्यांच्या भावना भडकावणं योग्य नाही, एकनाथ शिंदे दोन नंबरचे नेते, अशा नेत्याला बाजूला ठेवणं योग्य नव्हतं. एकनाथ शिंदे सातत्यानं बोलत होते, भाजपसोबत जाऊ पण ते झालं नाही म्हणून शिंदे गट अखेर बाहेर पडला, असं केसरकरांनी सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget