(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिंदे गटाकडून शाखा बळकावण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाने आरोप करत पोलिसात दाखल केली तक्रार
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: ठाण्यातील लोकमान्य नगर येथील शिवसेनेची 45 वर्ष हून अधिक जुनी असलेली शाखा ताब्यात घेण्यासाठी रविवारी रात्री शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: ठाण्यात पुन्हा एकदा शिंदे गटाने शाखा बळकावण्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. ठाण्यातील लोकमान्य नगर येथील शिवसेनेची (Shiv Sena) 45 वर्ष हून अधिक जुनी असलेली शाखा ताब्यात घेण्यासाठी रविवारी रात्री शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. याबाबत ठाकरे गटाच्या वतीने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. तसेच अज पोलीस आयुक्त जयजित सिंह यांना पत्र देखिल दिलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे मंत्री मंडळातील सहकारी शाखा आणि इतर स्थावर गोष्टी ताब्यात घेणार नसल्याचे सांगत असताना अशा प्रकारे शाखा बळकावणे चुकीचे असल्याचे खासदार राजन विचारे (rajan vichare) यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा लोकमान्य नगर शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन्ही कडील कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली असून याबद्दल आता ठाकरे गटाने पोलीस आयुक्तना निवेदन दिलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही वर्तक नगर पोलिस ठाण्यात तक्रार दखल केलीय. शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाले असून उलट ठाकरे गटाने आमच्या पक्षचा गैरवापार केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. दरम्यान ज्या शाखेवरून वाद निर्माण झलाय त्या शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोटो असणारा बॅनर लावण्यात आला असून ठाकरे गटाचा आमच्या शाखेवर हक्क सांगण्याचा काहीही अधिकार नसल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: दापोलीत शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे-ठाकरेंचे समर्थक आमने-सामने
दरम्यान, 17 फेब्रुवारी रोजी दापोलीत शिवसेना (Shiv Sena) शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरेंचे समर्थक आमने-सामने आले होते. आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. त्यामुळे दापोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उद्धव ठाकरे गटाची शाखा शिंदे गट समर्थकांनी ताब्यात घेतली. शिवाय आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या शिवसेना शाखेत घुसून गोंधळ घातला. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या राड्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.