(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray : भाजप नावाच्या फुग्यात आम्हीच हवा भरली, आता त्यांचा डोक्यात हवा गेली; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Speech at Shivaji Park : देशात फक्त दोन खासदार असणाऱ्या भाजप नावाच्या फुग्यात आम्हीच हवा भरली, आता त्यांचा डोक्यात हवा गेली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Uddhav Thackeray Full Speech : देशात फक्त दोन खासदार असणाऱ्या भाजप (BJP) नावाच्या फुग्यात आम्हीच हवा भरली, अन् त्यांचा डोक्यात हवा गेली, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) तोफ डागली आहे. देशात फक्त दोन खासदार असणाऱ्या भाजप नावाच्या फुग्यात आम्हीच हवा भरली. त्यांच्या डोक्यात आता हवा गेली. 400 पार जागांची स्वप्न बघतात. 400 पार जागा म्हणजे काय फर्निचरचं दुकान आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
'भाजपच्या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं'
भाजप एक फुगा आहे पण, मला वाईट याचं वाटतं की, या फुग्यात आम्हीच हवा भरण्याचं काम केलं. संपूर्ण देशात भाजपचे दोन खासदार होते. त्या फुग्यात आम्ही हवा भरली, त्यांच्या डोक्यात आता हवा गेली. काय त्यांची स्वप्न. 400 पार जागा म्हणजे काय फर्निचरचं दुकान आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
तुमच्या (भाजपच्या) परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढेच तुमचा परिवार आहे बाकी परिवार आहे, कुठे संविधान वाचवण्याचं. ज्या संविधानाबद्दल शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे, याची सुरुवात कोर्टापासून करा. कोर्टामध्ये ज्या वेळेला एखादा येतो किंवा कोर्टामध्ये एखाद्या काही स्टेटमेंट द्यायला येतो, तेव्हा जो येतो तो त्याच्या धर्मग्रंथावर ठेवून शपथ घेतो, ते बाजूला करा आणि आपल्या देशाची जी घटना आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली शपथ घ्या, हे राज्यघटनेचं महत्त्व आहे. यांना 400 पार आकडा त्याच्यासाठी पाहिजे, हे आता स्पष्ट झालेले आहे. कारण त्यांचेच एक मंत्री आनंदकुमार हेगडे बोलले की आम्हाला घटना बदलायची आहे, म्हणून चारशे पार करायचे आहेत.
तुम्ही किती जण बातम्या वाचता मला कल्पना नाही पण, काल मी एक बातमी वाचली की, रशियामध्ये निवडणुका सुरु आहेत.पुतीन आणि त्यांच्या विरोधात कोण आहे, तर कोणीच नाही कारण जे विरोधक होते, ते एकतर तुरुंगात आहेत आणि नाहीतर बहुतेक सगळे देशाबाहेर त्यांनी तडीपार करून टाकलेले आहेत. लढायला कोणी नाही, पण दाखवतात, कसा मी बाबा लोकशाही मानतो बघा, मी निवडणूक घेतली, मला पण समोर उभाच नाही, तर मी काय करू, ही अशी सगळी परिस्थिती आज आपल्या समोर एक वेळ येऊन ठेपलेली आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की. देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तर आम्ही वाचू.
संविधान बदलण्यासाठी यांना '400 पार' हवंय
शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर तोफ डागली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की. भाजपला 400 पार कशासाठी पाहिजे. राज्यघटना, संविधान बदलण्यासाठी 400 पार आकडा हवाय. देश हाच माझा धर्म, देश वाचला तरच आम्ही वाचू. व्यक्तीची ओळख देश झाली पाहिजे देशाची ओळख व्यक्ती नाही, आपल्यासमोर अशी वेळ घेऊन ठेपली आहे, असंही ठाकरे म्हणाले आहेत.
पाहा व्हिडीओ : भाजप एक फुगा, ज्यात आम्हीच हवा भरली, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
महत्त्वाच्या इतर बातम्या :