Saamana Editor in Chief : उद्धव ठाकरे पुन्हा 'दैनिक सामना'चे मुख्य संपादक
Saamana Chief Editor : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'दैनिक सामना'मध्ये आज दोन मोठे बदल पाहायला मिळत आहेत. 'दैनिक सामना'च्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली हाती.
Saamana Editor in Chief : शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या 'दैनिक सामना'मध्ये (Dainik Saamana) आज दोन मोठे बदल पाहायला मिळत आहेत. पहिला बदल म्हणजे 'दैनिक सामना'च्या मुख्य संपादकपदाची (Editor in Chief) धुरा पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या खांद्यावर घेतली हाती. मागील आठवड्यात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे.
उद्धव ठाकरे मुख्य संपादक, कार्यकारी संपादकपदी संजय राऊत कायम
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 'दैनिक सामना'च्या संपादकपदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मार्च 2020 महिन्यात हे पद उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र आता उद्धव ठाकरे हे दैनिक सामनाचे मुख्य संपादक असतील. तर कार्यकारी संपादकपदी संजय राऊत यांचं नाव कायम ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काळात 'दैनिक सामना'मधून खुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजप तसेच इतर विरोधकांवर टीकेचे आसूड ओढले जाण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांच्या अटकेनंतर सामनाचे अग्रलेख कोण लिहिणार, रोखठोक सारखं सदर कोण लिहिणार असे प्रश्न उपस्थित झाले होते. मला अग्रलेख लिहायला द्या, अशी मागणी देखील केली होती. पण ते शक्य नसल्याने उद्धव ठाकरे हेच 'सामना'चे मुख्य संपादक झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात विरोधी पक्ष तसंच शिवसेनेच्या बंडखोरांवर सामनाच्या माध्यमातून आसूड अशी शक्यता आहे. शिवसेनेची भूमिका सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे सामनाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्याचं काम करतील. उद्धव ठाकरे आपल्या लेखणीची जादू कशाप्रकारे दाखवतात हे येत्या काळात समजेल.
पहिल्याच पानावर आव्हाडांच्या वाढदिवसाची जाहिरात
आजच्या सामनातील दुसरी गोष्ट म्हणजे वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची वाढदिवसाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. "निष्ठेचे दुसरे नाव म्हणजे आव्हाड" अशा आशयाची जाहिरात देऊन शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे सामनाच्या इतिहासात पहिल्यांदाच दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची जाहिरात पहिल्या पानावर देण्यात आली आहे.
Uddhav Thackeray Samana Editor in Chief : दैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे