डॉ. आंबेडकरांनी घटना लिहिली म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय, ती बदलण्यासाठीच यांना 400 खासदार पाहिजेत; उद्धव ठाकरेंचा वार
Uddhav Thackeray Vs Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समुद्राच्या तळाशी जाऊन आले पण ते धाराशिवमध्ये येऊनही तुळजा भवानी मंदिरात गेले नाहीत, त्यांच्या मनात महाराष्ट्रद्वेष असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
पुणे : घरं आणि पक्ष फोडण्याची सवयच भाजपला असून भाजपचा जनक असलेल्या जनसंघाने सर्वप्रथम सीमालढ्यात फुट पाडली, आणि त्यांना हवं ते मिळवलं असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली, त्यामुळेच भाजपच्या पोटात दुखतंय. एका दलित कुटुंबातील जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धीमान कसा असा प्रश्न यांना पडला असून त्यामुळेच भाजपला घटना बदलायची आहे. त्यासाठीच यांना 400 पेक्षा जास्त खासदार पाहिजे असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. पुण्यातील जाहीर सभेत त्यांनी हा आरोप केला.
आपल्या मशालीच्या गाण्यामध्ये जय भवानी या शब्दाला भाजपचा घरगडी असलेल्या निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपच्या मनात सुरुवातीपासूनच महाराष्ट्रद्वेष असल्यानेच नरेंद्र मोदी हे धाराशिवमध्ये येऊनही तुळजा भवानीच्या मंदिरात गेले नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मोदीजी तुम्ही समुद्राच्या बुडाला जाऊन आला, पण तुळजा भवानी मंदिरात गेला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
बाबासाहेबांनी लिहिलेली घटना बदलण्यासाठी यांना 400 पेक्षा जास्त खासदार हवे आहेत.
गेल्या निवडणुकीत माझ्या आणि मोदी यांच्या सभा झाल्या आहेत. लहान भाऊ होतो तर नातं का तोडल? तुम्ही स्वतःला चिमटा काढून बघा तुम्ही पंतप्रधान होतात. आता खुर्ची जाणार ही भिती त्यांना आहे.
भटकता आत्मा म्हणालात, कुणाला? पवार साहेबांना? वखवखलेला आत्मा पण असतो. 300-350 वर्षांपूर्वी असाच एक वखवखलेला आत्मा आला होता महाराष्ट्र राज्यावर चालून. पण तो औरंगजेब परत कधी गेलाच नाही, त्याचा आत्मा अजूनही भटकत असेल इकडे.
तुम्हाला जरा संवेदना असतील तर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्याकडे बघा, त्यांच्या पत्नीच्या तुटलेल्या मंगलसूत्राकडे बघा.
मोदीजी माझ्या सेनेला नकली म्हणाले. आमच्यावर टीका करायची पण भ्रष्टाचाराची फौज तुमच्या सोबत आहेत. याद राखा जाहीर इशारा देतो. तुम्ही परत सत्तेत येणार नाहीच, पण घटनेला हात लावायची हिंमत केली तर देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. ही भेकड जनता पार्टी आहे हे मुद्दामून यांना बोलतो. यांनी कोणताही आदर्श निर्माण केला नाही, अशोक चव्हाण सोडले तर.
ही यांची बिन आत्म्याची शरीर फिरत आहेत, त्यांना जय भवानीच महत्व काय कळणार. धाराशिवला गेले पणं तुळजाभवानी मंदिरात गेले नाही, देवेंद्र फडणवीस पण आतापर्यंत तुळजाभवानीच्या मंदिरात गेले नाहीत.
400 पार म्हटल्यावर लोक आज तडीपार म्हणत आहेत. यांना देशाची घटना बदलायची आहे. इंडिया आघाडीचे 300 च्या वर खासदार निवडून येणारच. भाजपचे 300 खासदार 2 झाल्याशिवाय राहणार नाही. हे दोन खासदार कोण आले पाहिजे हे तुम्हालाही ठाऊक आहे.
ही बातमी वाचा :