इकडं जो उमेदवार उभा आहे, त्याचे व्हिडीओ फिरतायत, अशा व्यक्तीचा प्रचार करता? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल
Uddhav Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाला हात लावायची सोडा, त्याचे दर्शन घेण्याचीही तुमची पात्रता नाही.
Uddhav Thackeray, Nashik Meeting : "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाला हात लावायची सोडा, त्याचे दर्शन घेण्याचीही तुमची पात्रता नाही. मोदी कोणाचा प्रचार करतात? इकडं जो उमेदवार उभा आहे, त्याचे काहीतरी व्हिडीओ फिरत आहेत. अशा ज्या व्यक्तीचा उमेदवार आहे तो शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालू शकतो का?" असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरेंनी पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली.
कांदा उत्पादकांना अडकून ठेवणारे नतद्रष्ट सरकार
उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटकात प्रज्वल रेवण्णा बलात्कार करणारा माणूस आहे. महिलांवर अत्याचार करतानाचे व्हिडीओ काढणारा माणूस आहे. मोदी सांगतात या रेवण्णाला मत म्हणजे मोदीला मत. ही माझ्या महाराजांची बरोबरी होऊ शकते. हा माझ्या शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले यापुढे दक्षता घेऊ. म्हणजे तुम्हाला सुद्धा समजलंय की, ज्या डोक्यावर तुम्ही जिरेटोप घातला. ते डोक त्या लायकीचे नाही. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, असं सांगणारे शिवाजी महाराज कुठे आणि नाशिकमध्ये येऊन कांदा उत्पादकांना अडकून ठेवणारे नतद्रष्ट सरकार कोठे? असे सवालही उद्धव ठाकरेंनी केले.
आज तुम्हाला मुंबईत रस्त्यावर आणलेलं आहे
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज कांदा उत्पादक शेतकरी इथे आले आहेत. मी पोलीसांना विचारतो यांना का अडवलं नाही? हे कसे आले माझ्या सभेत? कारण ही माझी माणसं आहेत. मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील सांगतोय. मी माझी लढाई नाही तर तुमची लढाई लढतोय. तुमच्या भरोशावर मी हुकूमशाहच्या समोर उभारलो आहे. मी त्यांना आव्हान देतोय. आज तुम्हाला मुंबईत रस्त्यावर आणलेलं आहे. छत्रपती शिवाजी माहाराजांचा जो अपमान करेल, त्याला आम्ही गुढगे टेकायला लावणार आहोत. आम्ही महाराजांची शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहोत. राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान आणि आपल्याकडेचे गद्दार सोबत घ्यावे लागले. 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री कितीचा असेल. ही सगळी नकली संतानं. कारण मोदीजी तुम्हाला राजकारणात पोरंच होत नाहीत, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
इतर महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray : ... तर प्रफुल्ल पटेल महाराष्ट्र तुम्हाला आपटेल : उद्धव ठाकरे