Uddhav Thackeray on Maratha Reservation : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं धन्यवाद, पण...
Uddhav Thackeray : मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले. मराठा समाजाला जाहीर झालेल्या आरक्षणानंतर (Maratha Reservation) उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विधेयकाच्या चर्चेसाठी विधीमंडळाच्या विधानपरिषदेच्या सभागृहात हजेरी लावली.
Uddhav Thackeray : मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले. मराठा समाजाला जाहीर झालेल्या आरक्षणानंतर (Maratha Reservation) उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विधेयकाच्या चर्चेसाठी विधीमंडळाच्या विधानपरिषदेच्या सभागृहात हजेरी लावली. यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "सभागृहात सर्व पक्षांनी एक मताने मराठा आरक्षण ठराव मंजूर केला. मला खात्री आहे ज्या पद्धतीने अभ्यास करून हे विधेयक मांडले गेले, हे विधेयक टिकेल अशी मला आशा वाटते"
मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो. मराठा समाजाने खूप लढा दिला आहे. मराठा समाजातील अनेकांना बलिदान द्यावे लागले. आंदोलकांची जी डोकी फोडली गेली, ते न करता देखील आरक्षण देता येईल. टिकणारे आरक्षण मिळेल अशी आशा बाळगतो. शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले आहे. किती जणांना नोकऱ्या मिळतात हे बघावं लागेल. दोन मते असती तर आम्ही एकमत दिले नसते. मुख्यमंत्री काय आहेत कसे आहेत त्यांचा इतिहास सर्वाना माहिती आहे. जनतेचा विश्वास मुख्यमंत्री यांच्यावर नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर आरक्षणाला धक्का नको
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. "छगन भुजबळ असो किंवा इतर कोणी असो दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लागू नये असे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा एकमताने ठराव मंजूर केला होता. हायकोर्टात ते आरक्षण टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. टीम तीच होती आता आरक्षण टिकावे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. टायमिंगच्या बरोबरीने वृत्ती महत्वाची असते. भाजपची वृत्ती चांगली असती तर त्यांच्यावर फोडाफोडीची वेळ आली नसती, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
सगेसोयरेंच्या मुद्यावरुन जरांगेंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आलाय. दरम्यान, सगेसोयरेंचा मुद्दा आजच्या विधेयकात न घेतल्याने जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. करोडो मराठ्यांची मागणी आहे ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण हवं आहे. जे आरक्षण आम्हाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच आहोत. सरकारने दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ते न्यायालयात टिकेल का? हा प्रश्न आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
'शिवरायांच्या नावाने खोटं बोलू नका', जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल