एक्स्प्लोर

Video: मी पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतात; ''मला जाऊ द्या ना घरी, 'आता वाजवले की बारा''

जमलेल्या माझ्या लढवय्या शिवसैनिकांनो, लोकसभा निवडणुकीच्या निकलानंतर पहिला आपला जाहीर कार्यक्रम आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा (Shivsena) 58 ना वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांनी वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यास्टाईलने फटकेबाजी करत भाजपसह मोदींवर हल्लाबोल केला. तर, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना हे मृगजळ असल्याचे म्हटले. तर, उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला लक्ष्य केलं. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरही टीका केली. 

जमलेल्या माझ्या लढवय्या शिवसैनिकांनो, लोकसभा निवडणुकीच्या निकलानंतर पहिला आपला जाहीर कार्यक्रम आहे. शिवसेना म्हटल्यावर नवं चैतन्य आणि तरुणाई आली पाहिजे, मविआची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी मी धन्यवाद दिले आहे. पण, पुन्हा एकदा शिवसेनेच्यावतीने सर्व हिंदू मुस्लिम शीख बौद्ध या सगळ्या धर्मांचे साथ दिल्याबद्दल आभार मानतो, अशी सर्वधर्मीयांचे आभार मानत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

भाजपसोबत जाणार नाही

मी शून्य आहे, यशाचे धनी तुम्ही आहात, आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. पण, आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे. अहंकार जो मोदींमध्ये आहे. आता पुन्हा एकदा चर्चा करतात उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार, ज्यांनी शिवसेना फोडली, मातेसमान शिवसेनेला फोडलं, त्या नालायकांसोबत परत जायचं? आता त्यांची फाटलीये, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. तसेच, यापुढे भाजपसोबत जाणार नाही, असेही स्पष्ट केले.

पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतात

तुम्ही देशाच्या मंत्र्यांना पक्षाचं काम दिला तर देशाचा काम कोण करणार, असा सवाल उपस्थित करत भाजपने नेमणूक केलेल्या प्रभारी व सहप्रभारी यांच्या नियुक्तीवर ठाकरेंनी आक्षेप घेतला. तसेच, पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे आता काय म्हणतायत? जाऊद्या ना घरी, आता वाजवले की बारा... आता एवढे बारा वाजवले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. दरम्यान, राज्यातील 11 विधानपरिषद जागाच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. जर, अपात्र आमदारांची सुनावणी सर्वोच्च न्यायालय सुरू आहे, तर मग तुम्ही ही निवडणूक घेणार कशी, असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे.

मध्यावधी निवडणुका झाल्या तर...

भुजबळ शिवसेनेत जाणार? अशी चर्चा आता सुरू आहे. पण, भुजबळ तुमच्याशी बोलले? ते माझ्याशी बोलले? सगळे समजदार आहेत ते त्यांचा बघतील ना? तुम्हाल त्याचा काय?, असे म्हणत भुजबळांच्या शिवसेना पक्षातील चर्चेला ठाकरेंनी पूर्णविराम दिला. मध्यावधी निवडणूक लागली तर तुम्ही कदाचित खासदार खासदार व्हाल. म्हणून पराभव झालेल्या उमेदवारांचा सत्कार मी केला. हे सरकार आता चालेलअसं वाटत नाही. ते म्हणताय मराठी हिंदू मत मिळाली नाहीत. शिवसेनेला मुस्लीम मतं मिळाली, हो आहे जरूर पडले आहेत. सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळाली आहेत.  डोम कावळे तिकडे बसलेत आता त्यांचा पिंडदान सुद्धा आलाय 

चंद्राबाबू आणि नितीशकुमार हिंदुत्त्ववादी आहेत का?

नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आहे. 2014 आणि 2019 चा फोटो त्यांच्या सरकारचा पाहा आणि आता किती हिंदुत्ववादी त्यांच्यासोबत आहेत. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत?, असा सवाल ठाकरेंनी विचारला. तसेच, आम्ही पाठीमागून वार करणारे नाही, समोरून वार करणारे आम्ही आहोत. अनेक युट्युबर आहेत त्यांनी आम्हाला साथ दिली. मिंदे बोलतायत शहरी नक्षलवाद. म्हणजे मी देश वाचवत असेल तर मी आतंकवादी होतो 

एकनाथ शिंदेंना चॅलेंज

अमोल तुला पाडलेला गद्दार काय म्हणतो, मी जर तिकडे गेलो नसतो तर मला आतमध्ये टाकलं असतं. मिंदे आणि भाजपला सांगतो तुम्ही जर षंड नसाल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न लावता, धनुष्यबाण चिन्ह न घेता आणि शिवसेना नाव न लावता निवडणूक लढा, असे चॅलेंजच ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिले. माझ्या वडिलांचा फोटो वापरता आणि मला स्ट्राइक रेट सांगतात. मिंदेच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा

राज ठाकरेंवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे नको म्हणून बिनशर्त पाठिंबा काही जणांनी दिला, उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट पाठींबा दिला. म्हणजे बिन शर्ट पाठिंबा दिला, बघा मी उघड पाठिंबा देतो म्हणाले फक्त उद्धव ठाकरेंना पाडण्यासाठी, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवरही हल्लाबोल केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल
लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल
Devendra Fadnavis: लोकसभेच्या चुका विधानसभेला नको, सर्वस्व झोकून काम करा; देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या पराभूत उमेदवारांना सूचना
लोकसभेच्या चुका विधानसभेला नको, सर्वस्व झोकून काम करा; देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या पराभूत उमेदवारांना सूचना
Anant Ambani Radhika Merchant Wedding Invitation : सोन्याची मूर्ती, चांदीचं मंदिर..भक्ती आणि परंपरेचा मेळ, अनंत-राधिकाची लग्नपत्रिका पाहिली का?
सोन्याची मूर्ती, चांदीचं मंदिर..भक्ती आणि परंपरेचा मेळ, अनंत-राधिकाची लग्नपत्रिका पाहिली का?
Maharashtra Assembly Session 2024: राज्य सरकार अधिवेशनात गेमचेंजर निर्णय घेण्याच्या तयारीत, मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत?
राज्य सरकार अधिवेशनात गेमचेंजर निर्णय घेण्याच्या तयारीत, मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 27 June 2024 : ABP MajhaTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 27 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahalaxmi Race Course Special Report : रेसकोर्सवरुन आरोपांची शर्यत, विरोधकांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल
लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल
Devendra Fadnavis: लोकसभेच्या चुका विधानसभेला नको, सर्वस्व झोकून काम करा; देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या पराभूत उमेदवारांना सूचना
लोकसभेच्या चुका विधानसभेला नको, सर्वस्व झोकून काम करा; देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या पराभूत उमेदवारांना सूचना
Anant Ambani Radhika Merchant Wedding Invitation : सोन्याची मूर्ती, चांदीचं मंदिर..भक्ती आणि परंपरेचा मेळ, अनंत-राधिकाची लग्नपत्रिका पाहिली का?
सोन्याची मूर्ती, चांदीचं मंदिर..भक्ती आणि परंपरेचा मेळ, अनंत-राधिकाची लग्नपत्रिका पाहिली का?
Maharashtra Assembly Session 2024: राज्य सरकार अधिवेशनात गेमचेंजर निर्णय घेण्याच्या तयारीत, मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत?
राज्य सरकार अधिवेशनात गेमचेंजर निर्णय घेण्याच्या तयारीत, मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत?
'आमची घरं तोडणाऱ्यांवर कारवाई करा', पवईतील भीम नगर येथील रहिवाशांची हायकोर्टात याचिका, SIT चौकशीची मागणी
'आमची घरं तोडणाऱ्यांवर कारवाई करा', पवईतील भीम नगर येथील रहिवाशांची हायकोर्टात याचिका, SIT चौकशीची मागणी
SA vs AFG Semi-final : अफगाणिस्तान फायनलमध्ये पोहचणार? चोकर्स दक्षिण आफ्रिकेच्या कमजोरीचा फायदा घेणार 
SA vs AFG Semi-final : अफगाणिस्तान फायनलमध्ये पोहचणार? चोकर्स दक्षिण आफ्रिकेच्या कमजोरीचा फायदा घेणार 
Raghu 350 : कॉलेजचे जिवलग मित्र राजकारणात होणार वैरी? रघु 350 चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार
कॉलेजचे जिवलग मित्र राजकारणात होणार वैरी? रघु 350 चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार
 IND vs ENG : रोहित शर्मा, जोस बटलरला कर्णधार करा, भारत-इंग्लंड सामन्यात Dream11 मध्ये 11 खेळाडूंना द्या संधी, मालामाल व्हाल
 IND vs ENG : रोहित शर्मा, जोस बटलरला कर्णधार करा, भारत-इंग्लंड सामन्यात Dream11 मध्ये 11 खेळाडूंना द्या संधी, मालामाल व्हाल
Embed widget