एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : अबकी बार 'चंद्रहार'! नामर्द पळून जातायत, मर्द पक्षात येतायत; डबल महाराष्ट्र केसरीच्या प्रवेशावर ठाकरेंनी दंड थोपटले

Uddhav Thackeray On Chandrahar Patil : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही लोकसभेसाठी कंबर कसली आहे. आता चंद्रहार पाटील यांच्या ठाकरे गटात प्रवेशानंतर ठाकरे गटाला सांगलीत खंदा उमेदवार मिळाला आहे.

Maharashtra Political News : मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी आज शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. पक्षातून नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात येत आहेत, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चंद्रहार पाटील यांचं पक्षात स्वागत केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) सध्या अनेक राजकीय हालचाली पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही लोकसभेसाठी कंबर कसली आहे. आता चंद्रहार पाटील यांच्या ठाकरे गटात प्रवेशानंतर शिवसेना उबाठा गटाला सांगलीत खंदा उमेदवार मिळाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थिती मातोश्रीवर सोमवारी पक्षप्रवेश पार पडला. यावेळी चंद्रहार पाटील यांच्याकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.

नामर्द पळून जातायत, मर्द पक्षात येतायत 

माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. या मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीत आपल्या विरुद्ध लढण्याची कुणाची छाती होणार नाही.  पक्षातून पळपुटे नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात येत आहेत.शिवसेना ही मर्दांची संघटना आहे. मी लहान असताना मारुती माने साहेब घरी यायचे, बाळसाहेबांना भेटायचे ते दिवस आठवले आणि तीच परंपरा आजदेखील कायम आहे. आज डबल महाराष्ट्र केसरी पक्षात आले. 'अबकी बार चंद्रहार' पण फक्त घोषणा देऊन चालणार नाही, सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल.

गदा आणि मशाल मर्दाच्या हातात शोभतात

लोकांनी ठरवलंच आहे, त्याला मी काय संकेत देणार. जनतेनं एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलिकडे काय संकेत द्यायचे. त्याच्यामुळे ही गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाच्या हातात शोभतात. हीच गदा आणि मशाल घेऊन आपल्याला एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. लवकरच सांगलीत येणार. पूर्ण महाराष्ट्रातील गद्दारांना आडवं करायचं आहे. हुकूमशाही विरुद्ध लढताना तुमच्यासारखे तरणेबाण मर्द पहिलवान शिवसेनेत आले आहेत आणि भविष्य तुमच्या हातात आहे. जनता आपल्याकडे अपेक्षेनं बघते आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

अब की बार 'चंद्रहार'

यावेळी खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, डबल 'महाराष्ट्र केसरी' महाराष्ट्राचा वैभव शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी कुस्तीचं मैदान गाजवलं आहे. ते कुस्ती क्षेत्रातले सचिन तेंडुलकर आहेत. हे खासदार की लढायला आले आहेत. चंद्रहार शिवसेनामध्ये सामील होतोय. शिवसेनेच्या मशाली सोबत चंद्रहारची गदा असणार आहे. अब की बार 'चंद्रहार' ही तुमची घोषणा आहे. चंद्रहारला जिथे पाठवायचा आहे, तिथे पाठवणारच. त्याला आता कोणी रोखू शकत नाही, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ :

 महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rohit Pawar : मराठा उमेदवारांचा फायदा भाजपला? निर्णय घेण्यापूर्वी विचार करा; रोहित पवारांचं मराठा समाजाला थेट आवाहन

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News LIVE Updates: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Shivsena Party Symbol Hearing In Supreme Court: तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीत काय काय घडलं?
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीत काय काय घडलं?
Fuel Saving Appeal : मोदींच्या आवाहनानंतर काही जण सायकलवर; काहीजण बैलगाडीने पोहोचले पालिकेत; तर पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी परदेशी दौरा केला रद्द
मोदींच्या आवाहनानंतर काही जण सायकलवर; काहीजण बैलगाडीने पोहोचले पालिकेत; तर पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी परदेशी दौरा केला रद्द

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
Devendra Fadnavis and PM Modi: मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
Embed widget