एक्स्प्लोर

Uddhav Thackeray And Rahul Gandhi Meeting: दिल्लीत राज ठाकरेंची चर्चा; राहुल गांधी अन् उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray And Rahul Gandhi Meeting: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत.

Uddhav Thackeray And Rahul Gandhi Meeting: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) इंडिया आघाडीच्या (India Alliance) बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray And Rahul Gandhi Meeting) यांची एक स्वतंत्र बैठक झाली. काल (7 ऑगस्ट) झालेल्या बैठकीत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास 30 मिनिटे चर्चा झाली. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर आणि राज ठाकरेंसोबतच्या आघाडीवरही चर्चा झाल्याचं समोर येत आहे. यासह सुप्रिया सुळे, शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची वेगळी बैठक झाली.

ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय?

काही दिवसांआधी शिवसेनेचं मुखपृष्ठ असलेल्या दैनिक सामनासाठी संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी मुलाखत घेतली होती. यावेळी संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय?, असा प्रश्न विचारला होता. शिवसेना आणि मनसे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी भविष्यात एकत्र येऊन राजकीय निर्णय घेतला तर मविआचे काय होणार हा एक प्रश्न त्यात निर्माण होतो. मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे. ठाणे स्वतंत्र विषय आहे, असं संजय राऊत म्हणाले. यावर मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीयदृष्ट्याही कदापिसुद्धा वेगळी समजत नाही. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा वेगळा आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही. राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी जसं शिवसेनेचं युनिट आहे तसं इतर पक्षांचंही आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या जे योग्य वाटत असेल तसेच करू. लढायचं तर नक्कीच आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू- उद्धव ठाकरे

आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे काय? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. मी तर स्पष्टच सांगतो की, अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करतायत. गुजराती आणि हिंदी वगैरे इतर भाषिकसुद्धा म्हणाले, 'अच्छा किया आपने', त्यांना झालेला हा आनंद मी बघतो. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

संबंधित बातमी:

Raj Thackeray-Uddhav Thackeray Matoshree: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे बाळासाहेबांच्या खोलीत गेले अन्...; मातोश्रीवर काय घडलं?, 'सामना'तून सांगितलं

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
Embed widget