Amit Thackeray On Uddhav Thackeray: अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना तो प्रश्न अन् दुसऱ्याच दिवशी काकांकडून पुतण्याला गिफ्ट; नेमकं काय घडलं?
Amit Thackeray On Uddhav Thackeray: मनसेचे नेते अमित ठाकरे एबीपी माझाच्या कट्ट्यावर सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

Amit Thackeray On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आल्यानंतर काका उद्धव ठाकरेंसोबत तुझं पहिलं बोलणं काय झालं?, असा प्रश्न अमित ठाकरेंना (Amit Thackeray) एबीपी माझाच्या कट्ट्यावर विचारण्यात आला. यावर एकमेकांच्या तब्येतीबाबत विचारणा केली. त्यावेळी दुसरं काही बोलताच आलं नाही, कसा आहेस वैगरे?, हे आमचं पहिलं बोलणं झालं. त्यानंतर रक्षाबंधन होतं, तेव्हा आम्ही सर्व कुटुंब भेटलो. त्यावेळी मी राजकीय बोलणं आमचं खूप कमी झालं. पण मी काका उद्धव ठाकरेंना विचारलं, दादु काका मला एक किआनचे फोटो काढण्यासाठी कॅमेरा घ्यायचा होता, तर कोणता चांगला आहे. यावर तुला मी सांगतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्याच्या काही दिवसांनंतर आदित्य ठाकरेंनी सांगितलं की तुला बाबांनी (उद्धव ठाकरेंनी) बोलावलं आहे. त्यानंतर मी मातोश्रीवर गेलो. मातोश्रीवर गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माझ्यासमोर त्यांचे सर्व जुने कॅमेरे आणून ठेवले आणि यामधील कोणता चांगला आहे, ते बघ, असं सांगितले. मला फोटो कसे काढायचे, हेही काकांनी दाखवलं. यावेळी मी खूप भारावून गेलो होतो. त्यानंतर मला एक कॅमेरा आवडला. यानंतर दुसऱ्याच दिवशी दादू काकांनी शिवतीर्थावर मला तो कॅमेरा पाठवला, अशी माहिती अमित ठाकरेंनी दिली. (Shivsena UBT-MNS Alliance BMC Election 2026)
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल?, अमित ठाकरे काय म्हणाले? (Amit Thackeray)
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल? वडिलांना की काकांना? यावर अमित ठाकरे यांनी उत्स्फुर्तपणे उत्तर दिलं की, काका झाले ना आता..म्हणजे यानंतर ठाकरेंपैकी मुख्यमंत्रिपदी आपले वडील राज ठाकरे यांना पाहायला आवडेल असं अमित ठाकरे यांनी म्हटलं. त्याचबरोबर जर राज ठाकरेंच्या हातात राज्याची सत्ता आली आणि जर ते मुख्यमंत्री झाले तर तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल, त्याच्या पलिकडे महाराष्ट्र घडवू, असा विश्वास अमित ठाकरेंनी यावेळी केला.
वडील एकटे पडू नये म्हणून राजकारणात आलो- अमित ठाकरे (Amit Thackeray On Politics)
राजकीय नेत्यांचे मोठ्या रक्कमेचे घोटाळे तसंच गुन्हेगारीकरणं एका फटक्यात संपवू असा विश्वासही यावेळी अमित ठाकरे यांनी व्यक्त केला. राजकारणात आपली येण्याची इच्छा नव्हती पण 2014 नंतर मनसेचा पडता काळ होता तेव्हा आपले वडील म्हणजेच राज ठाकरे हे एकटे पडू नयेत त्यांना आपण साथ दिली पाहिजे. आपल्या असण्यामुळं त्यांना 10 टक्के जरी फायदा झाला तरी ती मोठी गोष्ट असेल या हेतून आपण राजकारणात दाखल झालो, अशी माहिती यावेळी अमित ठाकरे यांनी दिली.
























