एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले, नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray : आम्ही सांगतोय निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस असल्याचे सांगत शिवसेना (Shiv Sena UBT)प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे.

Uddhav Thackeray : मतदारचे ओळख केंद्र आम्ही शाखेत सुरु करणार आहोत. सक्षम अँप आणि निवडणूक आयोग सर्व्हर (Election Commission Server) हे आयोग हाताळत नाही, असा संशय आम्हाला आहे. कोणीतरी माझ्या नावाने अँपमध्ये रजिस्टर केलं आणि मग ओटीपी आला असणार, ज्यातून माझे आणि माझ्या कटूबांचे नाव वगळले गेले असते. आम्ही मतदारांना सांगतो तुम्ही शाखेमध्ये या. तुमच्या नावात गोंधळ नाही ना? तुमची नावं तपासून घ्या. हि सगळी निवडणूक आयोगाची (Election Commission) भूताटकी आहे. त्यामुळे दुसरे कोणी मतदार तुमच्या पत्यावर असतील तर ते निदर्शनास आणून द्या. सरकार झेन-जीला घाबरत. आम्ही सांगतोय निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस असल्याचे सांगत शिवसेना (Shiv Sena UBT)प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाव सडकून टीका केली आहे.

Uddhav Thackeray on Election Commission : हि सगळी निवडणूक आयोगाची भूताटकी

पहिला मुद्दा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम गेला. आम्ही मोर्चा काढला होता, आमची मागणी होती कि, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आत्ता केंद्राचा पथक तीन दिवस पाहणी करणार आहे. आता पाहणी करणार कधी आणि प्रस्ताव देणार कधी? शेतकऱ्यांचे पुढच्या वर्षी जूनमध्ये कर्जमाफी होणार तर आताचे हप्ते भरायचे कीं नाही भरायचे? मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. महात्मा फुले कर्जमाफीचा दुसरा टप्पा जाहीर करावा, कारण डेटा तसाच आहे, आमच्याकडे कुठलीही समिती नव्हती. दिवाळी आधी पैसे शेतकऱ्यांना मिळतील, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोकळ आश्वासन दिलं होतं. आत्ता ते मिळाले की नाही ते बघू असे असताना

दरम्यान, हा आगपाखड करण्यासाठीचा दौरा नाही. जे पॅकेज जाहीर केलं होत त्यातले किती पैसे आले ते बघणार आहे. नेमकं सरकार काय करणार आहे? घोषित झालेल्या पॅकेज मधले शेतकऱ्याना काय मिळाले? यासाठी मी मराठवाडा दौरा करणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उभी आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray on Ashish Shelar: आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन, त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं

दरम्यान पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिलं. मी आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन करतो. त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं आहे. मतचोरीचा मुद्दा ते मानतच नव्हते. त्याच्यामुळे आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू बोलायचं धाडस दाखवलंय, हा त्यांच्यातील अंतर्गत वादाचा परिणाम असेल. देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये प्रचार करुन आल्यानंतरच आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली. आशिष शेलारांनी सिद्ध केलंय की, मतदार यादीत गोंधळ आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Ashish Shelar on MVA : माविने प्रामाणिक मतदारांची नावे वगळून ‘व्होट जिहाद’चा डाव रचला

दरम्यान, राज्यासह देशात मतचोरी आणि बोगस याद्यांचा मुद्दा गाजत असताना ठाकरे बंधूनी एकत्र येत सत्ताधारी बाजप आणि मित्रपक्षांवर सडकून टीका केली आहे. या टीकेला भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. यात त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत, “गळा मतचोरीचा... पण पुळका ‘व्होट जिहाद’चा!” अशी टीका केली. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत “महाविकास आघाडीने प्रामाणिक मतदारांची नावे वगळून ‘व्होट जिहाद’चा डाव रचला,” असे त्यांनी म्हटले. तर राज ठाकरे व्होट जिहाद करत असल्याचा आरोप देखील आशिष शेलार यांनी केला.

Raj Thackeray : मतदार यादीमध्ये घोळ, राज ठाकरेंनी यादीच दाखवली

दरम्यान, नुकताच मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत 'सत्याचा मोर्चा' (Mumbai Satyacha Morcha) काढण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचे सांगत पुरावे सादर केले. सोबतच पुराव्याचा भला मोठा गठ्ठाच समोर आणला. मतदार यादीमध्ये घोळ असताना निवडणूक घेण्याची घाई का? आतापर्यंत पाच वर्षे निवडणुका पुढे ढकलल्या, अजून एक वर्ष पुढे ढकला. पण मतदार याद्या साफ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या 1 जून 2025 च्या मतदार यादीचा संदर्भ देत राज्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये किती प्रमाणात दुबार मतदार आहेत याची यादीच वाचून दाखवली.

Raj Thackeray On Bogus Voter : कोणत्या मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार?

मुंबई उत्तर - 62,370 दुबार मतदार (एकूण मतदार-17,29,456)

मुंबई उत्तर पश्चिम - 60,231 दुबार मतदार (एकूण मतदार- 16,74,861)

मुंबई उत्तर पूर्व - 92,983 दुबार मतदार (एकूण मतदार-15,90,710)

मुंबई उत्तर मध्य - 63,740 दुबार मतदार (एकूण मतदार-16,81,048)

मुंबई दक्षिण मध्य - 55,565 दुबार मतदार (एकूण मतदार- 14,37,776)

मुंबई दक्षिण - 55,205 दुबार मतदार (एकूण मतदार- 15,15,993)

नाशिक - 99,673 दुबार मतदार(एकूण मतदार- 19,34,359)

मावळ - 1,45,636 दुबार मतदार (एकूण मतदार- 19,85,172)

पुणे - 1,02,002 दुबार मतदार (एकूण मतदार- 17,12,242)

ठाणे - 2,09,981 दुबार मतदार (एकूण मतदार-25,07,372)

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
Share Market : शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
Latur Crime: लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर
लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर
CM Yogi Meets PM Modi: सीएम योगींची थेट दिल्लीत धडक अन् पीएम मोदींची सुद्धा घेतली भेट; नेमकं काय घडतंय?
सीएम योगींची थेट दिल्लीत धडक अन् पीएम मोदींची सुद्धा घेतली भेट; नेमकं काय घडतंय?
Embed widget