Uddhav Thackeray and Sharad Pawar : देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी, राजशिष्टाचार विभागाकडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना निमंत्रण
Uddhav Thackeray and Sharad Pawar : राजशिष्टाचार विभागाकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर या सर्वांना उद्याच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
Uddhav Thackeray and Sharad Pawar, मुंबई : देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असून महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित असणार आहेत. भाजपच्या विधीमंडळातील गट नेतेपदी आणि देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राजशिष्टाचार विभागाकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर या सर्वांना उद्याच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्या साडेपाच वाजता आझाद मैदान येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते त्यासोबतच राज्यातील इतर राज्याचे पक्षप्रमुख पक्ष अध्यक्ष यांना सुद्धा राज शिष्टाचार विभागाकडून निमंत्रण देण्यात आला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांच्या शपथविधीसाठी पक्षाचे इतर राज्यांचे प्रमुखही लावणार हजेरी लावणार आहेत. दिल्ली, मणीपूर, नागालॅंड आणि मेघालय राज्याचे प्रमुख आज मुंबईत येणार दाखल होणार आहेत. महायुतीच्या शपथविधी समारंभात तिन्ही पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर नेते लावणार हजेरी लावणार आहेत.
मुंबईच्या आझाद मैदानात महायूतीच्या शपथविधीसाठी मुंबई पोलिसांकडून राहणार चोख पोलिस बंदोबस्त असणार आहे. शपथविधी सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडिच हजारहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शपथविधी दरम्यान 10 पोलिस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलिस आयुक्त, 100 पोलिस निरीक्षक, 150 सहाय्यक व पोलिस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर सशस्र पोलिस दल, टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत. या शिवास आझाद मैदान परिसर हा नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून आजू बाजूच्या उंच इमारतींवरही पोलिस तैनात असणार आहेत. शिवाय ड्रोन द्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)
महायुती- 237
मविआ- 49
अपक्ष/इतर - 02
---------------------
एकूण - 288
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष
जनसुराज्य शक्ती - 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)
भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137
इतर महत्त्वाच्या बातम्या