Uddhav Thackeray and Raj Thackeray : ठाकरे गट-मनसे एकत्र येण्याचा आणखी एक ठोस संकेत, संदीप देशपांडेंच्या हातात राऊतांचं पुस्तक; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Uddhav Thackeray and Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Uddhav Thackeray and Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shiv Sena UBT) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यात युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून राज ठाकरे यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि मनसेचे दुसऱ्या फळीतील नेते या युतीविषयी फार सकारात्मक दिसत नव्हते. परंतु, संजय राऊतांसह ठाकरे गटाच्या नेत्यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मकता दर्शवली होती. तर आता ठाकरे गटावर कडाडून टीका करणाऱ्या संदीप देशपांडेंकडून सूचक संकेत देण्यात आले आहेत. यामुळे ठाकरे गट-मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
ऐरवी खासदार संजय राऊतांवर सडकून टीका करणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडेंनी एक फोटो ट्विट केलाय. खासदार संजय राऊत यांचं 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक वाचताना संदीप देशपांडे यांनी त्यांचा फोटो पोस्ट केला आहे, आणि त्याचं कॅप्शन संदीप देशपांडेंनी लपवण्यासारखे काही नाही असे दिलंय, एकीकडे राऊतांवर टीका तर दुसरीकडे त्यांचंच पुस्तक वाचताना संदीप देशपांडेंनी फोटो पोस्ट केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
लपवण्यासारखे काहि नाही... pic.twitter.com/KUjIduAwgU
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 5, 2025
पुस्तक विकत घेऊन वाचले तर ते खरा अभिप्राय देता येतो
याबाबत संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, मी याआधी असे म्हटले नव्हते कि, पुस्तक विकत घेऊन वाचणार नाही, मी असे म्हंटले होते की, ईडीने काय चौकशी केली ते लिहायला हवं होतं, नेमके पुस्तकात काय आहे? ते वाचेल आणि अभिप्राय कळवेल. मी पुस्तक वाचतोय यात लपून वाचण्यासारखे काय कारण? म्हणून मी तसे कॅप्शन लिहिलेले आहे. पुस्तक विकत घेऊन वाचले तर ते खरा अभिप्राय देता येतो. जर पुस्तक भेट म्हणून आले तर खरं बोलता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रस्ताव येईल, तेव्हा राज साहेब निर्णय घेतील
शिवसेना-मनसेच्या युतीच्या चर्चांबाबत विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले की, रोज-रोज आम्ही सकारात्मक आहोत, सकारात्मक आहोत, असे बोलून काय होत नाही. ज्यावेळी प्रस्ताव येईल, तेव्हा राज साहेब निर्णय घेतील. जो पर्यंत प्रस्ताव येत नाही, तो पर्यंत काही बोलता येत नाही. 2014 आणि 2017 ला आमची जीभ पोळलेली आहे. त्यामुळे आम्ही ताक सुद्धा फुंकून पित आहोत, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा

















