एक्स्प्लोर

Eknath Shinde & Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, चाकणमध्ये ठाकरे-शिंदेंची शिवसेना एकत्र

Thackeray Camp and Shinde Camp Shvisena Alliance: चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती झाली आहे. खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पत्नीला उमेदवारी.

Thackeray Camp and Shinde Camp Shvisena Alliance: शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात टोकाचे वितुष्ट निर्माण झाले असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनपेक्षित घडामोड घडली आहे. राज्यात कुठंच एकत्र न आलेली ठाकरे अन शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये (Chakan News) एकत्र आली आहे. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. यानिमित्ताने 'एबीपी माझा'ने आमदार काळे यांच्याशी थेट संवाद साधला. याबाबत बोलताना बाबाजी काळे यांनी म्हटले की, खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडत आहे.  त्यांच्या पत्नी चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी (Nagarparishad Election 2025) उभ्या राहिल्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेऊन, दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही युती म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे असो वा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळ हा निर्णय चाकण  नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित असेल. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदीत आम्ही स्वबळावर लढतोय, असे बाबाजी काळे यांनी सांगितले.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या आमदार-खासदारांना कानपिचक्या 

मुंबई महानगर पालिका निवडणुकीबाबत मुंबईतील आमदार खासदार आणि नेत्यांना बैठकीत मुख्यनेते  एकनाथ शिंदे यांनी कानपिचक्या दिल्या. पालिका निवडणूक तोंडावर असताना काही नगरसेवकांनी पक्षातील आमदारांच्या तक्रारी शिंदेंकडे केल्या होत्या. आमदारांकडून त्यांच्या जवळच्या व्यक्तींना तिकिट मिळावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशात नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदेकडे आलेल्या नगरसेवकांच्या कामात अडथळा निर्माण केले जात आहेत. नगरसेवकांच्या कामात हस्तक्षेप होत असल्याने पश्चिम उपनगरयेथील काही इच्छुक विभागप्रमुख आणि काही माजी नगरसेवकरांनी नाराजी व्यक्त केली होती.

यावर शुक्रवारी झालेल्या बैठकीत शिंदेंनी नाव न घेता आमदारांना समज दिली. यावर बोलताना शिंदेंनी तुमच्या निवडुकांमध्ये या सर्वांनी प्रामाणिकपणे काम केल़े आहे. आता तुमची जबाबदारी आहे त्यांना निवडून आणायची. मोठ्या विश्वासाने ते आपल्यासोबत आले आहेत. ताकदीने त्यांच्या मागे उभे रहायला हवे. कुणालाही ते आपल्यासोबत आल्यानंतर पश्चाताप झाला असे वाटायला नको. शेवटी आपण आपली माणसं मोठी केली तर पक्ष मोठा होणार आहे, पक्ष मोठा झाला की आपणही मोठे होणार. पालिका निवडणुकीत जोमाने कामाला लागा, कोण एकत्र येत आहे त्याकडे लक्ष देऊ नका. माझंही सगळीकडे लक्ष असल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

आणखी वाचा

सिन्नरमध्ये अजित दादांच्या राष्ट्रवादीला धक्का; माजी उपनगराध्यक्ष अन् मंत्री माणिकराव कोकाटेंचे खंदे समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

Embed widget