Nashik News: सिन्नरमध्ये अजित दादांच्या राष्ट्रवादीला धक्का; माजी उपनगराध्यक्ष अन् मंत्री माणिकराव कोकाटेंचे खंदे समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश
Nashik News :अजित दादांच्या राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष आणि मंत्री माणिकराव कोकाटेंचे खंदे समर्थक नामदेवराव लोंढे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

नाशिक : राज्यात सध्या सर्वत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्याअनुषंगाने सामान्य कार्यकर्ता ते पक्षातील उच्च पदस्थ नेते कामाला लागले आहे. अशातच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात (Nashik Politics) उलथापालथ होत असल्याचं दिसून येतंय. अजित दादांच्या (Ajit Pawar NCP) राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष आणि मंत्री माणिकराव कोकाटेंचे (Manikrao Kokate) खंदे समर्थक नामदेवराव लोंढे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केलाय. या पक्ष प्रवेशामुळे सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांना एकप्रकारे धक्का देण्यात आल्याचे बोललं जात आहे.
दरम्यान, शिवसेनेत प्रवेश करताच नामदेवराव लोंढे यांना शिवसेनेकडून एबी फॉर्म देखील देण्यात आला असून थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणूनही घोषित करण्यात आलं आहे. परिणामी आता भगूरनंतर सिन्नरमध्ये शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे चित्र आहे.
Nashik Politics : शिवसेनेकडून एबी फॉर्म, थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणूनही घोषित
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवर बोलणं करून देत उपनेते विजय करंजकर आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत हा तातडीने पक्षप्रवेश करण्यात आलाय. माजी उपनगराध्यक्ष नामदेवराव लोंढे यांच्यासह सिन्नर नगर परिषदेच्या तीन माजी नगरसेवकांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच मंत्री कोकाट्यांवर नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे आता सिन्नरमध्ये महायुती स्वतंत्र लढणार असून महायुतीतचतिरंगी लढत बघायला मिळणार आहे.
तर महायुतीतील तीन पक्ष आणि महाविकास आघाडी असे चौरंगी लढत होणार आहे. दरम्यान, खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे यांचा भाजपने नगराध्यक्ष पदासाठी दोन दिवसापूर्वी प्रवेश केला होता. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात मोठया राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Before You Go
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा






















