Maharashtra Politics: ठाकरेंचे 10 आमदार श्रीकांत शिंदेंच्या डिनरला जाणार?; उद्धव ठाकरेंच्या आमदारांची संपूर्ण यादी!
Maharashtra Politics Shrikant Shinde: दिल्लीमध्ये विधानसभा सचिवांकडून विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी प्रशिक्षण शाळा आयोजित करण्यात आली आहे.

Maharashtra Politics Shrikant Shinde: महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित आमदारांना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आज (10 फेब्रुवारी) रात्री घरी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत यंदा 78 आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) 10 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 6 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नवोदित आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदारांसह महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार श्रीकांत शिंदेंनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहणार का?, अशी चर्चा रंगली आहे.
दिल्लीमध्ये विधानसभा सचिवांकडून विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी प्रशिक्षण शाळा आयोजित करण्यात आली आहे. विधीमंडळ सचिवालयाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी 78 आमदार दिल्लीत आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीतील घरी महाराष्ट्राच्या नवोदित आमदारांना घरी जेवणाचे निमंत्रण दिल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीने 233 जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर विजय मिळवता आला.
ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार-
१. सिद्धार्थ खरात (मेहकर)
२. गजानन लवाटे (दर्यापूर)
३. संजय देरकर (वणी)
४. अनंत (बाळा) नर (जोगेश्वरी पूर्व )
५. हरुन खान (वर्सोवा )
६. वरुण सरदेसाई (वांद्रे पूर्व)
७. महेश सावंत (माहीम)
८. मनोज जामसुतकर (भायखळा)
९. बाबाजी काळे (खेड आळंदी)
१०. प्रवीण स्वामी (उमरगा)
शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची यादी (Uddhav Thackeray MLA List)
1) मेहकर- सिद्धार्थ खरात
2) दर्यापूर - गजानन लवाटे
3) बाळापूर - नितीन देशमुख
4) वणी - संजय देरकर
5) परभणी - राहुल पाटील
6) विक्रोळी - सुनील राऊत
7) जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर
8) दिंडोशी - सुनील प्रभू
9) वर्सोवा - हरुन खान
10) कलिना - संजय पोतनीस
11) वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई
12) माहीम - महेश सावंत
13) वरळी - आदित्य ठाकरे
14) शिवडी - अजय चौधरी
15) भायखळा - मनोज जामसूतकर
16) खेड आळंदी - बाबाजी काळे
17) उमरगा - प्रवीण स्वामी
18) उस्मानाबाद - कैलास पाटील
19) बार्शी - दिलीप सोपल
20) गुहागर - भास्कर जाधव
एकनाथ शिंदेंच्या आमदारांची यादी- (Eknath Shinde MLA List)
अक्कलकुआ- आमश्या फलजी पाडवी
साक्री- मंजुळाताई तुळशीराम गावित
पाचोरा- किशोर (अप्पा) धनसिंग पाटील
मुक्ताईनगर- चंद्रकांत निंबा पाटील
बुलढाणा- संजय रामभाऊ गायकवाड
रामटेक- आशिष नंदकिशोर जैस्वाल
भंडारा- नरेंद्र भोजराज भोंडेकर
दिग्रस- संजय दुलीचंद राठोड
हदगाव- संभाराव उर्फ बाबुराव कदम कोहळीकर
नांदेड उत्तर- बालाजी कल्याणकर
कळमनुरी- संतोष लक्ष्मणराव बांगर
छत्रपती संभाजीनगर पश्चिम- संजय पांडुरंग शिरसाट
पैठण- विलास संदिपान भुमरे
वैजापूर- रमेश नानासाहेब बोरनारे
नांदगाव- सुहास द्वारकानाथ कांदे
मालेगाव बाह्य- दादाजी दगडूजी भुसे
जालना- अर्जुन खोतकर
पालघर- राजेंद्र धेड्या गावित
बोईसर- विलास सुकुर तरे
अंबरनाथ- बालाजी प्रल्हाद किणीकर
कल्याण ग्रामीण- राजेश गोवर्धन मोरे
ओवळा – माजीवाडा- प्रताप बाबूराव सरनाईक
कोपरी – पाचपाखडी- एकनाथ संभाजी शिंदे
मागाठाणे- प्रकाश राजाराम सुर्वे
भांडुप पश्चिम- अशोक धर्मराज पाटील
अंधेरी पूर्व- मूरजी कांनजी पटेल
चांदिवली- दिलीप भाऊसाहेब लांडे
चेंबूर- तुकाराम रामकृष्ण काते
कुर्ला- मंगेश अनंत कुडाळकर
कर्जत- महेंद्र सदाशिव थोरवे
अलिबाग- महेंद्र हरी दळवी
महाड- भरतशेठ मारुती गोगावले
पुरंदर- विजय सोपानराव शिवतारे
संगमनेर- अमोल धोंडीबा खताळ
नेवासा- विठ्ठलराव वकिलराव लंघे पाटील
परांडा- डॉ. तानाजी जयवंत सावंत
कोरेगांव- महेश संभाजीराजे शिंदे
पाटण- शंभूराज शिवाजीराव देसाई
दापोली- योगेश रामदास कदम
रत्नागिरी- उदय रविंद्र सामंत
राजापूर- किरण रविंद्र सामंत
कुडाळ- निलेश नारायण राणे
सावंतवाडी- दीपक वसंतराव केसरकर
राधानगरी- प्रकाश आनंदराव आबिटकर
करवीर- चंद्रदिप शशिकांत नरके
कोल्हापुर उत्तर- राजेश विनायक क्षिरसागर
खानापूर- सुहास अनिल बाबर
हातकंगणले- (सहयोगी पक्ष) अशोक माने
शिरोळ(सहयोगी पक्ष)- राजेंद्र येड्रावकर
महाराष्ट्रातील आमदारांना श्रीकांत शिंदेंकडून स्नेहभोजनाचं आयोजन, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

