Uddhav Thackeray & Raj Thackeray: ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
Shivsena & MNS: ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. याशिवाय, संजय राऊत, बाळा नांदगावकर यांचे फोटोही आहेत. शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण

Shivsena Thackeray Camp & MNS: डोंबिवलीत पुन्हा एकदा ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याची चर्चा रंगल्याची पाहायला मिळाले. निमित्त होते ते सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओचे . मनसेचे शहर अध्यक्ष राहुल कामत मंगळवारी डोंबिवली पश्चिमेकडील ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Camp) शाखेत गेले होते. त्यांनी ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी कामत यांना शुभेच्छा देत पुष्पगुच्छ दिला. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या आधी देखील पलावा पुलाच्या आंदोलनात मनसे (MNS) आणि ठाकरे गट एकत्र दिसला होता. त्या पाठोपाठ आता मनसेचे शहर अध्यक्ष यांनी ठाकरे गटाच्या शहर शाखेत भेट दिली. यानंतर डोंबिवलीत पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गट एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे . (Raj Thackeray & Uddhav Thackeray Alliance talks)
Uddhav Thackeray & Raj Thackeray: ठाकरे बंधुंनी एकत्र यावे! ठाण्यात लागले बॅनर्स
एकीकडे मनसेच्या नेत्यांनी डोंबिवलीत पुढाकार घेतला असताना ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने लावलेला भलामोठा बॅनरही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे गटाचे सहप्रवक्ते तुषार रसाळ यांनी हा फलक लावला आहे. या फलकावर, 'दोन मराठी वाघांनी एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा', असा मजकूर लिहला आहे. या फलकावर आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत यांच्या फोटोसह राज ठाकरे, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांचे फोटो एकत्र दिसत आहेत.
Solapur News: करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश
करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत केला प्रवेश. 'मुक्तागिरी' या शासकिय निवासस्थानी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी (बापू) पाटील , शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे , सिंदखेडराजा जि.बुलढाण्याचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर हे उपस्थित होते.
जयवंतराव जगताप दोन वेळा करमाळ्याचे आमदार होते . 1990 साली अपक्ष तर 2004 साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हा वरती आमदार झाले होते. माजी आमदार जगताप यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक देशभक्त स्व. नामदेवराव जगताप चार वेळा व चुलते स्व.अण्णासाहेब जगताप एक वेळेस आमदार होते. जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला सोलापूरात मोठं बळ मिळालं आहे.
आणखी वाचा
देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत! ठाण्यात झळकले बॅनर्स, शिंदे गटाने नितेश राणेंना डिवचलं























