एक्स्प्लोर

Nitesh Rane: देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत! ठाण्यात झळकले बॅनर्स, ठाकरे गटाने नितेश राणेंना डिवचलं

Nitesh Rane & Narayan Rane: नितेश राणे आणि नारायण राणे यांनी सध्या अनुक्रमे शिंदे गट आणि मनसेला अंगावर घेतले आहे. शिंदे गटाने मंत्रिमंडळ बैठकीत आमचा बाप बाळासाहेब ठाकरे, असे ठणकावून सांगितले.

Nitesh Rane News: महायुतीतील सगळ्या पक्षांचा बाप भाजप असल्याने आमचा मुख्यमंत्री बसलाय, अशी टिमकी वाजवणाऱ्या नितेश राणे यांच्यामुळे सध्या सत्ताधारी गटात अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या या वक्तव्याबद्दल शिंदे गटाने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नव्हे तर, 'आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?', असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला होता. यानंतर ठाण्यात ठाकरे गटाच्या (Shivsena Shinde Camp) कार्यकर्त्यांकडून नितेश राणे यांना डिवचणारे बॅनर्स झळकताना दिसले. ठाकरे गटाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ यांनी ठाण्यातील मुख्य रस्त्यावर एक भलामोठा बॅनर लावला. 'मी तुषार दिलीप रसाळ... दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप). श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत, असा मजकूर या बॅनरवर लिहला होता. हा बॅनर लावून ठाकरे गटाने राणे पिता-पुत्रांविरोधात एकप्रकारे दंड थोपटले आहेत. त्यामुळे आता यावर नारायण राणे किंवा नितेश राणे काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नितेश राणे यांनी अलीकडेच धाराशिव येथील कार्यक्रमात त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाषण केले होते. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा, असा दमच नितेश राणेंनी दिला होता. यापूर्वीही नितेश राणे यांनी, 'काय करायचं ते करा आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय...' अशा आशयाचे वक्तव्य केले होते. या सगळ्यामुळे महायुतीतील इतर पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नितेश राणे यांना खडसावल्याची माहिती आहे. कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, संबंधित मंत्र्यांशी मी बोललो, ते म्हणाले माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, पण मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात जो काही अर्थ असेल त्यापेक्षा जे परसेप्शन जातं ते राजकारणात महत्त्वाचं असतं, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

MNS Vs Rane: मनसेही आक्रमक, राणे पिता-पुत्रांना इशारा

नारायण राणेंनी प्रकाश महाजनांवर टीका केल्यानंतर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी देखील राणे पिता-पुत्रांना इशारा दिला होता.  नारायण राणे जर, राज ठाकरे आणि तुमचे संबंध सांगण्यापलीकडे असतील तर तुम्ही तुमच्या बोलघेवड्या पुत्राला आवर घालणं अपेक्षित आहे. आणि महाराष्ट्र सैनिकांना धमक्या देण्याची हिंमत करु नका, आम्ही उगाच कोणाच्या काड्या करत नाही. आणि काड्या करणाऱ्याला सोडत नाही, असा थेट इशारा यशवंत किल्लेदार यांनी दिला होता. 

आणखी वाचा

मोठी बातमी : तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget