(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Udayanraje Bhosale : शरद पवारांना फोडाफोडीचं नोबेल दिलं पाहिजे, उदयनराजेंचा हल्लाबोल
Udayanraje Bhosale on Sharad Pawar, सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीये.
Udayanraje Bhosale on Sharad Pawar, सातारा : गेल्या काही महिन्यांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Sharad Pawar NCP) जोरदार इनकमिंग सुरु आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केल्यानंतर संपूर्ण खालसा झालेला पक्ष पवारांनी पुन्हा एकदा उभा केलाय. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीत सुरु असलेल्या पक्ष प्रवेशांवर भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांनी भाष्य केलं आहे. अतुल भोसले यांचा फार्म भरल्यानंतर उदयनराजे यांची कराड (Karad) येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
उदयनराजे भोसले काय काय म्हणाले?
उदयनराजे भोसले म्हणाले, फोडाफोडीचं राजकारण आज झालेलं नाही. तुम्हीच विचार करा किती जण फोडलेत. फोडाफोडीचं जाऊद्या, आम्ही बघून घेऊ. मी पवार साहेबांचा आदर राखतो. मी वयाचा सन्मान राखून बोलतो. फोडा फोडी सुरु आहे. शरद पवारांना फोडाफोडीचा नोबेल दिला पाहिजे, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांनी जोरादार टीका केलीये. शरद पवार यांच्या पक्षात सुरु असलेल्या इनकमिंगबाबतच्या प्रश्नावर उदयनराजे यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे.
गेल्या काही आठवड्यात हर्षवर्धन पाटील, समरजीत घाटगे, लक्ष्मणराव ढोबळे, अशा अनेक
शरद पवार गटाकडून उदयनराजेंना जोरदार प्रत्युत्तर
उदयनराजे भोसलेंच्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी x प्लॅटफॉर्मवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. विद्या चव्हाण लिहितात, राजे, शुध्दीवर अहात ना? मग स्वतःची मेमरी अप डेट करा! 50 कोटीचे खोके देऊन ,फोडाफोडीच राजकारण @Dev_Fadnavis उर्फ अनाजी पंतांना नोबेल पुरस्कार द्या! जाणता राजा असलेल्या शरदचंद्र पवार” “तुतारी” ने अवघा महाराष्ट्र जादुई झालाआहे! राजे हरतां,हरतां पिपाणीने वाचवलं तुम्हाला !
राजे, शुध्दीवर अहात ना? मग स्वतःची मेमरी अप डेट करा! ५०कोटीचे खोके देऊन ,फोडाफोडीच राजकारण @Dev_Fadnavis उर्फ अनाजी पंतांना नोबेल पुरस्कार द्या! जाणता राजा असलेल्या शरदचंद्र पवार” “तुतारी” ने अवघा महाराष्ट्र जादुई झालाआहे!
— Vidya Chavan (@Vidyaspeaks) October 24, 2024
राजे हरतां,हरतां पिपाणीने वाचवलं तुम्हाला !@NCPspeaks
इतर महत्त्वाच्या बातम्या