एक्स्प्लोर

Tukaram Mundhe: महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’

या नियमानुसार, महाप्रसादाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल. भारताच्या इतिहासात सर्व धर्मीयांच्या सणांसाठी वर्षभराचा असा स्थायी आदेश काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Tukaram Mundhe: सण-उत्सवांच्या काळात भाविक आणि नागरिकांना मिळणारा महाप्रसाद, लंगर अथवा भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) थेट रडारवर असणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सण-उत्सवांच्या काळात होणारी अन्नातील भेसळ रोखण्यासाठी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा ऐतिहासिक आणि धर्मनिरपेक्ष निर्णय जाहीर केला आहे. या नियमानुसार, महाप्रसादाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल. भारताच्या इतिहासात सर्व धर्मीयांच्या सणांसाठी वर्षभराचा असा स्थायी आदेश काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.

वार्षिक कॅलेंडर आणि तीन स्तरांवर वर्गीकरण

सणांच्या काळात मिठाई, खवा, पनीर, तूप, सुकामेवा आणि मटण-चिकनची मागणी अनेक पटींनी वाढते; त्यामुळे भेसळीची शक्यताही दाट असते. हे रोखण्यासाठी एफडीएने वर्षभराचे कॅलेंडर तयार केले असून सर्व सणांचे तीन स्तरांत वर्गीकरण केले आहे. 

  • प्रथम श्रेणी (राज्यव्यापी): गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ (ख्रिसमस) आणि नववर्ष पूर्वसंध्या.
  • द्वितीय श्रेणी (प्रादेशिक): मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी व कार्तिक वारी, श्रावण मास, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंती.
  • तृतीय श्रेणी (स्थानिक): स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरुस.

चार टप्प्यांत होणार धडक कारवाई

  • कारवाईची प्रक्रिया ही सणाच्या 21 दिवस आधी सुरू होऊन सण संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत सुरू राहील. ही मोहीम एकूण चार टप्प्यांत राबवली जाईल:
  • पहिला टप्पा (पूर्वतयारी): हाय-रिस्क अन्नाचे नकाशांकन, विशेष पथकांची नियुक्ती आणि प्रयोगशाळांना पूर्वसूचना.
  • दुसरा टप्पा (नाका तपासणी): गिरण्या, घाऊक मंड्या आणि वाहतुकीवर लक्ष. पहाटेच्या वेळी विशेष नाका तपासणी.
  • तिसरा टप्पा (सणाचा दिवस): सणाच्या दिवशी विशेष भरारी पथकांद्वारे प्रत्यक्ष ठिकाणांची सरप्राईज तपासणी.
  • चौथा टप्पा (कायदेशीर कारवाई): दोषींवर खटले दाखल करणे आणि अहवाल आयुक्तांकडे सादर करणे.

अन्नपदार्थानुसार 'हाय रिस्क' तपासणीचे नियोजन

  • उपवासाचे पदार्थ व दुग्धजन्य उत्पादने: भगर, साबुदाणा, राजगिरा यांचे आधीच नमुने घेणे तसेच बुरशीजन्य पदार्थांवर बारीक लक्ष ठेवणे.
  • मांस, पाणी व बर्फ: स्वच्छता, शीत साखळी (Cold Chain) आणि अधिकृत कत्तलखान्यांची वैधता तपासणे.
  • सजावट व रंग: मिठाईवर वापरला जाणारा चांदीचा वरख खरोखर शुद्ध चांदीचा आहे की नाही आणि खाद्यरंगांची मर्यादा तपासणे.
  • विशेष सण तपासणी: अक्षय्य तृतीयेला फळे पिकवण्याच्या पद्धती, नाताळमध्ये बेकरी उत्पादने, तर रमजान आणि ईद काळात विशेष अन्न तपासणी.

झिरो टॉलरन्स आणि त्वरित खटले

ई-कॉमर्स, आयात अन्नपदार्थ, बेकरी आणि पॅकबंद पाणी या सर्वांवर एफडीएची कडक नजर असेल. 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवले जात असून, सण-उत्सवांमध्ये कोणतीही अप्रिय घटना घडू नये हा यामागील मुख्य उद्देश आहे. सण संपल्यानंतर १४ दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोषींवर न्यायालयात खटले दाखल केले जातील. इथून पुढे प्रत्येक सणासाठी वेगळा आदेश काढण्याची गरज उरणार नसून, हा स्थायी आदेश पूर्ण वर्षासाठी लागू राहील.

इतर महत्वाच्या बातम्या

About the author अजय माने

अजय माने
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget