एक्स्प्लोर

Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video

Raj Thackeray: मिश्रा बोलत होते त्यांच्याकडे एक पेपरचा गट्टा होता आणि त्यांच्या पेपर च्या गट्ट्याकडे मेहता बघत होते, त्यांच्या गट्ट्याकडे मेहता बघून एक चांगलं पुस्तक होऊ शकते

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यापूर्वी तुरुंगातील अनुभवाची माहिती देणारं पुस्तक नरकातील स्वर्ग प्रकाशित केले होते. त्यानंतर, आज संजय राऊत लिखित 'बोध कीर्तन' या पुस्तकाचा प्रकाशनाचा सोहळा ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), लेखक अंबरिश मिश्र प्रमुख पाहुणे होते. संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात, असे म्हणत संजय राऊतांनी पुस्तक सोहळ्यात फटकेबाजी केली. तर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनीही संजय राऊतांचे व्यक्तिमत्व उलगडताना ठाकरे शैलीत बोध कीर्तन प्रकाशनावेळी जोरदार प्रवचन दिले. 

राज ठाकरे म्हणाले, मिश्रा बोलत होते त्यांच्याकडे एक पेपरचा गट्टा होता आणि त्यांच्या पेपर च्या गट्ट्याकडे मेहता बघत होते, त्यांच्या गट्ट्याकडे मेहता बघून एक चांगलं पुस्तक होऊ शकते असा विचार करत होते, माझे लक्ष मेहतांकडे होते. मराठी कशी बोलली पाहिजे, लिहिली पाहिजे याचे सगळे प्रबोधन आणि जबाबदारी ही त्यांनी घेतली पाहिजे, असे म्हणत राज ठाकरेंनी पुस्तकाच्या प्रकाशकांना उद्देशून भाषणाची सुरुवात केली. शासकीय कार्यालय विशेषत कोर्टाचे त्यांनी भूमिका मांडली, कोर्टाच्या नोटिसा अनेकदा येतात त्यात मला कळत नाही. मला धरले की सोडले आहे, इतकी घाणेरडी मराठी लिहिलेली असते. 

आपण पुस्तक वाचली पाहिजे, त्यात आणखी एक नमुना आला आहे, ते पुस्तक वाचावे. माझे आणि संजय राऊत यांचे संबंध खूप जुने आहेत. दिलीप ठाकूर आणि राऊत हे माझ्या वडिलांकडे येऊन बसायचे, अनेकदा शिव्या खाल्ल्या आहेत. संजय राऊतांचा पहिला संबध आला माझ्या वडिलांसोबत, मग बाळासाहेब यांच्यासोबत, अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.  

राऊत लोकप्रभामध्ये होते, आता बोलायला काही वेगळ नाही. मी 1980 च्या साली लोकसत्ताला व्यंगचित्रे फ्रीलांस करायचो, संजय राऊत हे गँगवारच्या स्टोरीसाठी प्रसिद्ध होते. तेव्हा कँटीनमध्ये आम्ही भेटायचो, 88-89 मध्ये ते सामनात आले. आमची चांगली मैत्री होती चांगलीच 'च' ला महत्त्व आहे. आमचे बोलणे व्हायचे, संजय नेहमी चिडायचे. हा कोणता सामना, वर बाळासाहेब लिहिले आणि सगळे मुळमुळ लिहील ही भाषा शोभते का असे सगळे बोलायचे. संजय राऊतांनी शिवसेनेवर टीका करणारे खूप लेख लिहिले आहे, बाळासाहेब शिव्या घालायचे इथं ते सांगता येणार नाही. राऊतांनी मला विचारले की, बाळासाहेब मुलाखत देतील का? मी म्हटलं, विचारून पाहील, शिव्या पडल्या तरीही संजय राऊत तयार झाले. मुलाखत शिवसेना भवनात सुरू झाली, भर मुलाखतीत त्याला शिव्या दिल्या. शिव्यासोबत मुलाखत छापण्यात आली, ती मुलाखत बाळासाहेबांना आवडली, असा किस्सा संजय राऊत आणि बाळासाहेबांच्या पहिल्या मुलाखतीचा राज ठाकरेंनी उलगडला. ती मुलाखत शिव्यांसकट चालवली तेव्हा बाळासाहेबांना आवडलं.. बंदे मे दम है... अशी आठवणही राज यांनी सांगितली. 

मोदींचं कॅम्पेन केलंय की काय? - राज ठाकरे

पहिले मला वाटलं की, यामध्ये मोदींचं कॅम्पेन केलंय की काय, अनेक गोष्टी या पुस्तकात आहेत. राऊतकडून अनेक पुस्तक यावी परंतु बाहेर राहून यावी हीच इच्छा, अशी मिश्कील टीपण्णी राज ठाकरेंनी केली. ऑर्थर रोड जेलबाहेर जमलं तर मेहता पब्लिकेशनला स्टॉल मिळेल, आणखी पुस्तक लिहिणारे पुढे येतील, असेही मजेशीरपणे राज यांनी म्हटले. 

पेन दिसत नाहीत, आताची मुले मोबाईलवर - उद्धव ठाकरे

राज सामना पर्यंतचा तू प्रवास सांगितलास. सकाळी चहा पिताना बातमी बघायचो आणि त्यात बाळासाहेबांवर सामनामध्ये अग्रलेख आला की समजायचं काही तर गडबड झाली आहे. मी फोन करायचो तेव्हा ते म्हणायचे काही नाही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तसेच भेटायचं. या पुस्तकामध्ये दिसत आहे की, मी का लिहितो. काही दिवसांनी अक्षरे, पेन म्युझिअममध्ये जातील की काय असा प्रश्न पडतोय. आताच्या मुलांना लिहिण्यापेक्षा मोबाईलवर फास्ट टायपिंग करता येते. पूर्वी एक शब्द होता बाई वेडा आता चर्चेत आहे ते मोबाईल वेडा.. असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. 

आम्ही वाचतो कमी, वाचवतो जास्त

अनेकांना वाटत आम्ही जास्त वाचन करतो, परंतु आम्ही वाचतो कमी आणि वाचवतो जास्त. वाचवायचा नादात अनेक गोष्टी वाचायचं राहून जातात.हळू हळू या गोष्टी कमी व्हायरला लागल्या आहेत. कोणतेही पान अनुक्रमात नाही, असे पाहिले पुस्तक असेल. काही पानावर चार ओळी आहेत, परंतु त्या चार ओळीत सुद्धा पुस्तक आहे. 

हेही वाचा

संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी

About the author अजय माने

अजय माने
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Beed Suresh Dhas: विरोधात काम करणाऱ्याची बाजू घेतो का? सुरेश धसांच्या दमदाटीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, नेमकं काय प्रकरण?
विरोधात काम करणाऱ्याची बाजू घेतो का? सुरेश धसांच्या दमदाटीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, नेमकं काय प्रकरण?
Shivendraraje Bhonsle: 'वरिष्ठांच्या सूचना देऊनही राष्ट्रवादी अन् सेनेने वेगळा निर्णय घेतला'; भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांची स्पष्टोक्ती; मंत्री जयकुमार गोरेंवरही अप्रत्यक्षपणे निशाणा
'वरिष्ठांच्या सूचना देऊनही राष्ट्रवादी अन् सेनेने वेगळा निर्णय घेतला'; शिवेंद्रराजे भोसले यांची स्पष्टोक्ती; मंत्री जयकुमार गोरेंवरही अप्रत्यक्षपणे निशाणा
Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, तर गाय दूध 4 रुपयांनी महागले; गोकुळच्या दरवाढीचा निर्णय 21 तारखेपासून लागू, नव्या अध्यक्षांनी सांगितलं कारणं, नेमकं काय म्हणाले?
म्हैस दूध 6 रुपये, तर गाय दूध 4 रुपयांनी महागले; गोकुळच्या दरवाढीचा निर्णय 21 तारखेपासून लागू, नव्या अध्यक्षांनी सांगितलं कारणं, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
Embed widget