Devendra Fadnavis and Krishnaraj Mahadik: मनसेविरुद्धच्या आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण कृष्णराज महाडिकांवर का रागावले? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
Devendra Fadnavis and Krishnaraj Mahadik: कृष्णराज महाडिक यांनी मुंबईत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरावर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. रवींद्र चव्हाणांनी भाजयुमोला फटकारले होते.

Devendra Fadnavis and Krishnaraj Mahadik: अमित ठाकरे यांनी पुण्यातील महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो उतरवल्यानंतर मुंबईत भाजप युवा मोर्चाने कृष्णराज महाडिक यांच्याविरुद्ध आंदोलन केले होते. कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घराबाहेर जाऊन अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा निषेध करण्याची योजना आखली होती. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसे आणि भाजयुमोच्या (BJYM) कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर ठेवले होते. मात्र, यावेळी मनसेने जोरदार शक्तीप्रदर्शन आणि आक्रमक पवित्रा घेतल्याने ते तुलनेत नवख्या असलेल्या भाजयुमो आणि कृष्णराज महाडिक यांच्यापेक्षा वरचढ ठरल्याचे चित्र राजकीय वर्तुळात निर्माण झाले होते. या आंदोलनांतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजयुमोच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्या प्रकाराविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एबीपी माझाच्या 'माझा इन्फ्रा व्हिजन' कार्यक्रमात भाष्य केले. (Maharashtra Politics news)
'एबीपी माझा'च्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी या विषयाला हात घातला. अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचा फोटो काढला. भाजपला याचा नक्की किती राग आला? कारण कृष्णराज महाडिकांनी एक आंदोलन केलं, ते पण 24 तास उलटल्यानंतर. मग त्यानंतर महाडिकांवर रवींद्र चव्हाण रागावले. यावर तुमची भूमिका काय, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी म्हटले की, आमच्यासमोर हा प्रश्न होता की, एखादा व्यक्ती बालबुद्दीने वागला तर त्यावर किती प्रतिक्रिया द्यायची. म्हणजे आपण त्या बालबुद्धीला महत्त्वं द्यायचं की, त्याकडे दुर्लक्ष करायचं, या संभ्रमात आम्ही होतो. त्यामुळे आमच्या पक्षातील जे तरुण आहेत, त्यांनी राग प्रकट केला. आमच्यातील जे प्रगल्भ आहेत, त्यांचं मत असं होतं की, लोकांना याच गोष्टी आवडत नाहीत, ते बालबुद्दीने वागले, यामधून एकप्रकारे त्यांच्याबद्दल मत लोकांचं खराब होतं, समजतं हे किती बालबुद्धी आहेत. त्यामुळे एका मर्यादेपेक्षा याला महत्त्व देऊ नये, ही आमची भूमिका होती. त्यामुळे त्यांनी प्रसिद्धीसाठी केलं, दुसरं कारण नव्हतं. आमच्या नवनाथ बनने दुसऱ्या दिवशी त्यांच्या कार्यालयातील फोटो ट्विट केला ज्यामध्ये शिवाजी महाराजांचा अशा लोकासोबत होता की, त्याची त्या पक्षाला लाज वाटली पाहिजे. त्यामुळे त्यांना प्रतिक्रिया देऊन हवी ती प्रसिद्धी द्यायची, मनसुबे सफल होऊन द्यायचे की नाही, एवढाच प्रश्न होता. पण या सगळ्यावर माझं हेच मत आहे की, हे वागणं अतिशय मुर्खासारखे आहे. या पलीकेड मला यावर बोलायचे नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा
Before You Go
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका






















