एक्स्प्लोर

CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

dharmaveer 2: धर्मवीर 2 या चित्रपटात आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अनेक घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांचा दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव. शिंदे यांना या सर्वाची कुणकुण लागली होती.

छत्रपती संभाजीनगर: राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही स्वर्गीय आनंद दिघे यांच्याप्रमाणे घात करण्याचा कट आखण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप सिडको महामंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात होत्या. त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे, अशी शिफारस पोलिसांनी स्वत:हून केली होती. तरी त्या फाईलवर सही करण्यात आली नाही. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना शहीद करण्याच्या मार्गावर उभे करणे, असा होतो. एकनाथ शिंदे हे सर्व डावपेच ओळखून होते. या परिस्थितीमध्येही एकनाथ शिंदे हे खंबीर होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिघे पॅटर्न (Anand Dighe) वापरला जाणार, अशी चर्चा त्यावेळी सुरु असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले. ते रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

आनंद दिघे यांची हत्या झाली होती: संजय शिरसाट

संजय शिरसाट यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आणखी एक गंभीर आरोप केला. आनंद दिघे यांची हत्या झाली होती. ठाण्यातील सर्वांना याची माहिती आहे. आनंद दिघे यांचा अपघात झाला होता. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. त्यांचा रक्तदाब आणि शुगर व्यवस्थित होती. अशावेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका कसा आला, असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. आनंद दिघे यांची वाढती ताकद काहींना खटकत होती.  शिवसेनेत आनंद दिघे यांना मोठ्या पदावर आणून बसवले तर गोची होईल, हे ज्या नेत्यांच्या लक्षात आले होते, त्यांनीच आनंद दिघे यांचा काटा काढला असावा. आपल्यापेक्षा कोणीही मोठे होता कामा नये, ही रणनीती आखणारे लोक त्या पक्षात आहेत, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला होता: रामदास कदम

आनंद दिघे साहेब तरुण पिढीला कळणे गरजेचे होते.पण त्यांच्या मृत्यूचे निवडणुकीच्या तोंडावर राजकारण नको, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते   रामदास कदम यांनी व्यक्त केली. आनंद दिघे हे बाळासाहेब यांना सदैव दैवत मानत, त्यांचे पाय धुवायचे. पण दिघेंच्या मृत्यूच्या काही दिवस आधी उद्धव ठाकरेंनी त्यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला होता, असा आरोप रामदास कदम यांनी केला. उद्धव ठाकरे यांना आपल्यापेक्षा कोणी मोठा होईल याची भीती वाटत होती. धर्मवीर आनंद दिघे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असेही रामदास कदम यांनी म्हटले.

आणखी वाचा

शिरसाट, गोगावले अन् बालाजी किणीकरांमध्ये होती मंत्रिपदासाठी स्पर्धा; गोगावलेंची मंचावरुन खदखद नंतर सारवासारव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Jain Boarding: रात्री 10.30 वाजता फोन, Whatsapp वर पत्र पाठवलं, मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?
रात्री 10.30 वाजता फोन, Whatsapp वर पत्र पाठवलं, मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?
Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांकडे SIT ची मागणी, बीडच्या 'त्या' पुढाऱ्यांवर टीका, मारहाण झालेला मुकादम समोर आणला, डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे आक्रमक
डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देणारच, धनंजय मुंडे आक्रमक, मुकादमाचे 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर असूनही मारहाण, मुंडेंनी मुकादम समोर आणला
Election Commission : संपूर्ण देशभरात SIR राबवणार, पहिल्या टप्प्यात 10 राज्यांचा समावेश, निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार
संपूर्ण देशभरात SIR, पहिल्या टप्प्यात 10 राज्यांचा समावेश, निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kartiki Mahapuja : 'उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्हा परिषदेचे विद्यार्थी पूजा करणार', शिक्षणमंत्री Dada Bhuse यांचा प्रस्ताव
Ranji Trophy: 'There was no communication', निवड समितीवर Ajinkya Rahane ची नाराजी
Pigeon Menace: 'कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या Pneumonia वर Treatment नाही'; पर्यावरणप्रेमींचा गंभीर इशारा
Bhoomi Pujan: अमित शहांच्या हस्ते BJP च्या नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन, दिल्लीच्या धर्तीवर उभारणार!
Maharashtra Politics: 'पंतप्रधान न्यायाधीशांना प्रभावित करतात का?', Eknath Shinde यांच्या भेटीनंतर Sanjay Raut यांचा सवाल.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Jain Boarding: रात्री 10.30 वाजता फोन, Whatsapp वर पत्र पाठवलं, मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?
रात्री 10.30 वाजता फोन, Whatsapp वर पत्र पाठवलं, मुरलीधर मोहोळ अन् राजू शेट्टींमध्ये काय बोलणं झालं?
Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांकडे SIT ची मागणी, बीडच्या 'त्या' पुढाऱ्यांवर टीका, मारहाण झालेला मुकादम समोर आणला, डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे आक्रमक
डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देणारच, धनंजय मुंडे आक्रमक, मुकादमाचे 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर असूनही मारहाण, मुंडेंनी मुकादम समोर आणला
Election Commission : संपूर्ण देशभरात SIR राबवणार, पहिल्या टप्प्यात 10 राज्यांचा समावेश, निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार
संपूर्ण देशभरात SIR, पहिल्या टप्प्यात 10 राज्यांचा समावेश, निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Phaltan Crime : फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी निलंबित PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीत काय घडलं?
फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी निलंबित PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीत काय घडलं?
Shubman Gill on Harshit Rana: शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
Embed widget