एक्स्प्लोर

Tejasvi Ghosalkar: उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही त्यांच्यासोबतच; मुंबई बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण

Tejasvi Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर यांचे दिवंगत पती, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत.

Tejasvi Ghosalkar Shivsena Thackeray Camp: मी पक्षात नाराज होते. पण उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी माझी नाराजी दूर केली. त्यामुळे मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. ते माझे कुटुंबप्रमुख आहेत. मी दुसऱ्या कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार केलेले नाही. असं काहीही झालेलं नाही. या सगळ्याला वेगळे वळण दिले जात आहे, असे वक्तव्य तेजस्वी घोसाळकर (Tejasvi Ghosalkar) यांनी केले. तेजस्वी घोसाळकर यांची नुकतीच भाजपचे वर्चस्व असलेल्या मुंबई बँकेच्या (Mumbai Bank) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून तेजस्वी घोसाळकर या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये (BJP) जातील, अशी चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी तेजस्वी घोसाळकर यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला.

माझ्या पुढच्या वाटचालीबाबत बोलायचे झाले तर मी पहिल्यांदाच सहकार क्षेत्रात काम करत आहे. अभिषेक दोन टर्म इकडे संचालक होते. त्यांचा सहकार क्षेत्राचा अभ्यास खूप जास्त होता. मीदेखील चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन. आता सहकार आणि राजकारण हे दोन्ही वेगवेगळे ठेवून समाजकारण करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितले.

मी योग्यवेळी भूमिका मांडेन, असे म्हटले होते. पण सध्या माझी कोणतीही भूमिका नाही. तुम्ही या सगळ्याला वेगळे वळण लावत आहात. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, अजूनही त्यांच्यासाठीच काम करत आहे. आता संचालक पद मिळाल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांची भेट घेईन. मला त्यांचे आशीर्वाद मला पाहिजे आहेत. ते माझे कुटुंबप्रमुख आहेत, असे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले.

Vinod Ghosalkar: संजय राऊत आणि विनोद घोसाळकरांच्या भेटीत काय झालं? तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...

यावेळी तेजस्वी घोसाळकर यांना संजय राऊत आणि विनोद घोसाळकर यांच्या भेटीबाबत विचारण्यात आले. त्यावर तेजस्वी यांनी म्हटले की, संजय राऊत आणि विनोद घोसाळकर का भेटले आणि त्यांच्यात काय चर्चा झाली, हे मला माहिती नाही. मी त्यांना याबाबत विचारले नाही, असे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले.

तसेच माझ्या कुठलाही दबाव नाही. संपर्क साधणारे कसेही संपर्क साधतात. पण त्याला रिस्पॉन्स काय म्हणून द्यायचा ते आपल्यावरती असते. मला तुर्तास पक्षप्रवेशासाठी कोणीही संपर्क केलेला नाही. मला जे काही मला पद मिळाले ते सहकार क्षेत्रात मिळाले आहे. यामध्ये राजकारण करू नका. मी अभिषेक यांचे स्वप्न होतं, ते पूर्ण करायचा प्रयत्न करत आहे. 

दरेकर यांनी मला सांगितलं होतं की, वेळ लागेल, पण हे तुम्हाला पद मिळेल. पण आता त्यांचं टायमिंग जुळून आले आहे. मी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीत ज्या नगरसेवकांना पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता, त्यांनी उद्धव ठाकरे यांना तशी माहिती दिली. माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही, हे तेजस्वी घोसाळकर यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा

ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांनी भाजपची सत्ता असलेल्या मुंबै बँकेत संचालक होताच थेट पक्षालाच दाखवला आरसा! म्हणाल्या, 'पक्षीय जोडे बाजूला ठेवून..'

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget