ज्याला रुमणं, कुळवं, दांडा, खुरपणं माहिती नाही, अशी माणसं कृषीमंत्री होतात, सुषमा अंधारे तोंडी परिक्षेत काय म्हणाल्या?
Sushma Andhare : एक्ससाईजचं खातं दारु, सिगारेट, गुटखा याच्यावर कंट्रोल आणण्याचे आहे. जर त्याच खाताच्या माणसाने सभागृहात तंबाखू चोळली तर कसं होणार? जो आरोग्यमंत्री आहे,
Sushma Andhare : "एक्ससाईजचं खातं दारु, सिगारेट, गुटखा याच्यावर कंट्रोल आणण्याचे आहे. जर त्याच खाताच्या माणसाने सभागृहात तंबाखू चोळली तर कसं होणार? जो आरोग्यमंत्री आहे, त्याला जर माहिती नसेल की, हत्तीपाय नावाचा रोग कशामुळे होतो. ज्याला रुमणं माहिती नाही, कुळवं माहिती नाही, दांडा माहिती नाही, खुरपणं माहिती नाही, दुबार पेरणी कळत नाही, खताचं प्रमाण कळत नाही. ज्याला अंतर पीक कसे असतात, याचे प्रमाण माहिती नाही, अशी माणसं कृषीमंत्री होतात", असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. 'एबीपी माझ्या'च्या तोंडी परिक्षेत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्या बोलत होत्या.
ती भाषणे तो अभ्यास लुप्त झालाय
सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, मी जी संसद अभ्यासली, विधीमंडळ अभ्यासली. ती भाषणे, तो अभ्यास लुप्त झालाय, फक्त शिवराळ पण उरलाय. संजय राऊत यांनी नवनीत राणांवर केलेलं भाष्य मला मोबाईलवर मिळालं. याच्यावर राहत इंदुरी यांची कविता आहे, वो बुलाती है मगर जानेका नही, असं म्हणत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. श्रीकांत शिंदे माझे आवडते भाच्चे आहेत. त्यांच्याबद्दल भाजपवाल्यांना प्रचंड तक्रारी आहेत. ठेकेदार वेठीस धरतात. कोणाची बिल लवकर निघू देत नाहीत. प्रत्येक काम मलाच मिळालं पाहिजे. कल्याण परिसरात चुना पुडी, फ्रिज अशा सर्व एजन्सी माझ्याकडेच पाहिजेत, असा हेकेखोरपणा आहे. पण नितेश आणि निलेश राणे खातात कमी आणि तोंड जास्त भरवतात, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
अजित पवार अशावेळी निंबाळकरांना तिथे बसवू शकत होते
पुढे बोलताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, निलम गोऱ्हे यांनी माझ्यामुळे शिवसेना सोडली नाही, त्यांना त्यांची खुर्ची वाचवायची होती. त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी आमच्याकडील नंबर कमी होती. अशा वेळी त्यांना त्यांची जागा सुरक्षित करण्यासाठी तिकडे जाणे महत्वाचे होते. अजित पवार अशावेळी निंबाळकरांना तिथे बसवू शकत होते. फडणवीसांना ते मान्य नव्हते. त्यानंतर मग निलम गोऱ्हे तिकडे शिफ्ट झाल्या. आमदारकी ,खासदारकी पेक्षा मी माझा सेल्फ रिस्पेक्ट ठेवणाऱ्या लोकांपैकी आहे. माझं काही काम करायचे असेल आणि मी मेसेज टाकला तर शिवसेनेकडून 2 तासांत सोडवली जाते, असंही सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या