एक्स्प्लोर

मोठी बातमी! सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

कुणाल कामराने जिथं हे गाणं गायलं, त्या स्टुडिओची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली. तसेच, कामराविरुद्ध मुंबईतील काही पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता

मुंबई : गत विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal kamra) आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याच्या कारवाईला जोर आला होता. आता, पावसाळी अधिवेशनात या दोघांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाला आहे.  कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर व्यंगात्मक टिका केली होती. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्या दाढी, चष्म्यावरुन आणि शिवसेना पक्षातील बंडावरुन केलेले विडंबनात्मक गाणे गायले. कुणाल कामराचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. तर, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. सुषमा अंधारेंनीही व्हिडिओ बनवला होता. त्यामुळे, या दोघांविरुद्ध हक्कभंग दाखल करण्यात आला होता, त्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

कुणाल कामराने जिथं हे गाणं गायलं, त्या स्टुडिओची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली. तसेच, कामराविरुद्ध मुंबईतील काही पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तर शिवसेना ठाकरे गटाच्या  उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील कुणाल कामराचं गाणं म्हटल्याचा व्हिडिओ समोर आला. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात देखील उमटले. त्यानंतर कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधानपरिषदेचे सदस्य आमदार प्रविण दरेकर यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्या विरोधातील हक्कभंग स्वीकारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग मंजूर झाला आहे. त्यानुसार, आता कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना सोमवारी नोटीस काढली जाणार असल्याने कॉमेडियन कामरा आणि शिवसेना नेत्या अंधारेंच्या अडचणी वाढल्या आहेत. 

कुणाल कामराने स्टँडअप कॉमेडी शोमध्ये एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या कवितेसंदर्भात हा हक्कभंग दाखल करण्यात आला होता. तर, कामराचा व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सुषमा अंधारेंनी शेअर करत, स्वत: व्हिडिओ बनवून समर्थन केल्याप्रकरणी त्यांच्यावर देखील हक्कभंग दाखल करण्यात आला होता. त्यास आता मंजुरी मिळाली आहे. 

हक्कभंग दाखल करताना काय म्हणाले दरेकर

सुषमा अंधारे यांनी बोलताना वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा आणि कुणाल कामराने हेतूपूरस्पर उपमुख्यमंत्री यांच्यावर वैयक्तिक आणि उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एकप्रकारे सभागृहाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यावर सभापती राम शिंदे यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडं योग्य त्या कारवाईसाठी पाठवित असल्याचे जाहीर केले होते. 

हेही वाचा

भाषासक्तीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका, मीरा भाईंदर राड्याप्रकरणी FIR

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात
CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget