भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि पक्षात प्रवेश द्यायचा, ही देवेंद्र फडणवीसांची स्टाईल; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule on Devendra Fadnavis, जळगाव : आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील चांगल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते.
Supriya Sule on Devendra Fadnavis, जळगाव : आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील चांगल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. दरम्यान फडणवीसांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) जोरदार हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी डेटा सांगावा माझी त्यांच्याबरोबर कुठेही चर्चेला बसायची तयारी आहे, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. त्या जळगावमधील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
दगड मारायचा आणि पळून जायचं ही भाजपला सवय आहे
सुप्रिया सुळे म्हणाल्या, दगड मारायचा आणि पळून जायचं ही भाजपला सवय आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि पक्षात प्रवेश द्यायचा, ही देवेंद्र फडणवीसांची स्टाईल आहे. चांगल्या योजना आजपर्यंत सरकारने नियमितपणे सुरू ठेवल्या आहेत. देवेंद्र फडणीसांचं विधान हे बालिशपणाच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवरही हल्लाबोल केलाय.
बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला 'भाऊ' म्हणवतात
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला 'भाऊ' म्हणवतात आहेत. बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार आहे. अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, 'बहिण-भावाचं' नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच.
नाती प्रेमाने जोडली जातात, केवळ पैशांनी नाही
महाराष्ट्रातील सरकार आगामी काळात अनेक योजना जाहीर करेल, पण त्यांना लोकसभेपर्यंत बहीण का आठवली नाही? त्या भावांनी नात्यात व्यवहार केला. नाती प्रेमाने जोडली जातात, केवळ पैशांनी नाही. ते म्हणतात की एक बहीण गेली तर दुसऱ्या बहिणी आणू, पण दीड हजारात विकले जाणारे हे नाते नाही, हा आमच्या बहिण-भाऊ या नात्याचा अपमान आहे. सत्ताधारी युतीतील दोन आमदार भाऊ सत्ता न आल्यास पैसे परत घेऊ अशी धमकी बहिणींना देत आहेत, हे दुर्दैवी आहे असे सांगून त्यांनी एका जरी बहिणीचे पैसे परत घेण्याचा प्रयत्न केला तर बघून घेऊ, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या
"सुप्रिया सुळेंचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल तर त्यांनाही लाडकी बहीणचे 1500 देऊ"