एक्स्प्लोर

हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यामुळं पक्षातील काहीजण नाराज पण...नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचं पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब यांचे सहा दशकांचे संबंध आहेत असे मत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केले.

Supriya Sule on Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचं पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब यांचे सहा दशकांचे संबंध आहेत असे मत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केले. ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत, याचा आनंद आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते मात्र आमचे संबंध कायम होते असेही सुळे म्हणाल्या. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील काहीजण नाराज झाले असतील तर ते साहजिक आहे. कारण प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी असे सुळे म्हणाल्या.

नाराज असलेल्यांची समजूत काढू

हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देताना इंदापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली असल्याचे सुळे म्हणाल्या. मात्र, त्यांना उमेदवारी दिल्यामुळं जे नाराज आहेत, त्यांची समजूत काढणं हे आमचं काम आहे ते आम्ही करु असेही सुळे म्हणाल्या. अजित पवारांच्या पक्षाने बारामतीतून कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. मात्र आमच्या पक्षांमध्ये सक्षम उमेदवार आहे. फक्त बारामतीतच नाही तर महाविकास आघाडीमध्ये सर्वच ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत. आपल्या भारतात टॅलेंटला कमी नाही. संपूर्ण भारतात टॅलेंट आहे, कुणीही अति आत्मविश्वासात राहू नये असेही सुळे यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्रात महिला आणि लहान मुलांवरती सातत्याने अत्याचार होत आहेत हे गृहमंत्र्यांचा अपयश आहे आणि त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा यामध्ये पोलिसांचा दोष नाही तर नेतृत्व अपयशी ठरल्याचे सुळे म्हणाल्या.  

हर्षवर्धन पाटील यांनी केली मोठी घोषणा

भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेत असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी मागणी केली. यानंतर पत्रकार परिषद घेत पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय गेतला आहे. मी हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतल्याचे पाटील म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 

महत्त्वाच्या बातम्या

थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
तटकरेंकडे नेमका कोणता जादूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
तटकरेंकडे नेमका कोणता जादूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget