(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule and Sunetra Pawar : बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढतीच्या चर्चा, पण नणंद - भावजयीच्या गळाभेटीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या
Supriya Sule and Sunetra Pawar : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आज (दि.8) गळाभेट घेतली आहे.
Supriya Sule and Sunetra Pawar : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आज (दि.8) गळाभेट घेतली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार यांच्यादरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातून लढत होणार असल्याच्या चर्चा असतानाच आता दोघींनी गळभेट घेतली आहे. बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदीरात दर्शनासाठी गेल्या असता दोघी सामोरा समोर आल्या त्यावेळी त्यानी गळाभेट घेतली.
आगामी लोकसभा निवडणुकीत आमने-सामने
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आगामी लोकसभा निवडणुकीत आमने-सामने असणार आहेत. शरद पवार गटाने सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारच अजित पवार गटाच्या उमेदवार असतील असे जाहीर केले आहे.
पवार कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच येणार आमने-सामने
गेल्या 3 दशकांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या गेल्या 15 वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत. मात्र, जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून घोषित करणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत एकमेकांसमोर असणार आहेत.
सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात महिलांशी संवाद साधताना अजित पवार आणि सुनेत्रा पवार सणसणीत टोला लगावला होता. "मी नवऱ्याच्या नावावर मतं मागत नाही,संसदेत माझा नवरा येत नाही. माझा नवरा कधी संसदे येत नाही. पण ज्याला उत्साह आहे, त्याने बायको लोकसभेत गेली की, कॅन्टीनमध्ये पर्स घेऊन बसायचं. संसदेत नोटपॅड लागते, तिथे पर्स नेऊन चालत नाही, असं सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं होतं.
Mayayuti Seat Sharing In Maharashtra : एकेरी जागा ते पक्ष तुमचा, चिन्ह आमचं! शिंदे-अजित पवारांची मोदी शाहांच्या महाशक्तीसमोर 'किती' डील होणार?