आम्ही संस्कारी, चारित्र्यहनन मुद्द्यावर प्रणिती शिंदेंना राम सातपुतेंनी फटकारलं
Solapur Constituency: येत्या काही दिवसांत माझं चारित्र्यहनन करणारे फोटो, पोस्ट दाखवल्या जातील, माझी बदनामी केली जाईल, असा संशय काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवला यानंतर चर्चेला उधाण आलं होतं.
Solapur Lok Sabha Constituency: सोलापूर : विरोधक खोटे आरोप करुन माझं चारित्र्यहनन करतील, असा आरोप सोलापूरच्या (Solapur News) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) उमेदवार प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde) विरोधकांवर केला होता त्यांच्या या आरोपाला राम सातपुतेंनी (Ram Satpute) काय प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही संस्कारी असून आमच्यावर असले संस्कार नाहीत, असं सांगत त्या आमच्या भगिनी आहेत, त्यांनी फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं, मी फक्त विकासावरच बोलत असल्याचं प्रत्युत्तर भाजप उमेदवार राम सातपुतेंनी दिलं आहे.
येत्या काही दिवसांत माझं चारित्र्यहनन करणारे फोटो, पोस्ट दाखवल्या जातील, माझी बदनामी केली जाईल, असा संशय काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवला यानंतर चर्चेला उधाण आलं होतं. यावर कडक शब्दांत प्रतिक्रिया देताना आम्ही संस्कारी असून आमच्यावर असले संस्कार नाहीत, असं सांगत त्या आमच्या भगिनी आहेत, त्यांनी फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं, मी फक्त विकासावरच बोलत असल्याचं उत्तर भाजप उमेदवार राम सातपुते यांनी दिलं आहे.
दरम्यान, मंगळवार सकाळपासून पंढरपूर तालुका आणि शहरात राम सातपुते यांनी गाठीभेटीचा कार्यक्रम सुरू केला होता. रात्री उशिरा पंढरपुरात फडावर करताना त्यांनी शाहिद मेजर कुणाल गोसावी यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेस वंदन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत प्रणव परिचारक, नीलराज डोंबे, लेखन चौघुले यांचेसह परिचारक गटाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होतं.
फडणवीसांनी सोलापूरला जितकं दिलं तेवढं काँग्रेसनं दिलं का? राम सातपुतेंचा थेट सवाल
सोलापूर लोकसभेला आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपानं निवडणूक गाजायला लागली होती. निवडणुकीची लाईन विकासावरून घसरून तिसरीकडेच चालल्याचं पाहून भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आता आपण फक्त विकासावरच बोलणार असल्याचं सांगून प्रणिती यांनीही फक्त विकासावरच बोलावं, असं सुनावलं आहे. फडणवीसांनी सोलापूरला जितकं दिलं तेवढं काँग्रेसनं दिलं का? असा सवाल करत त्यांनी सोलापुरातील केलेल्या कामांचा पाढा वाचला. प्रणिती शिंदे यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसल्यानं वाटेल तशी वक्तव्य करत असून पुलवामा हल्ल्यावरील आरोप हा तर तमाम शहिदांचा अवमान असल्याचं सातपुते यांनी सांगितलं आहे.